शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

अहमद जावेद यांची नियुक्ती बेकायदेशीर?

By admin | Published: September 09, 2015 1:32 AM

राज्य गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची महासंचालकपदी पदोन्नतीवर नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या जागी राज्य शासनाने अहमद जावेद यांची नियुक्ती केली आहे.

- जितेंद्र कालेकर,  ठाणेराज्य गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची महासंचालकपदी पदोन्नतीवर नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या जागी राज्य शासनाने अहमद जावेद यांची नियुक्ती केली आहे. मात्र, जावेद यांच्याविरुद्ध पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यावर त्यांनी स्थगिती मिळविली असून, त्याबाबतची पुढील सुनावणी येत्या १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. असे असताना त्यांना मुंबई पोलीस प्रमुखपदावर नियुक्त करणे हे नियमबाह्य असल्याचा आरोप अ‍ॅड. आशिष मेहता यांनी केला आहे.मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त एम.एन. सिंग आणि उपायुक्त एस.पी. गुप्ता यांनी सुमारे एक हजार पोलिसांच्या बदल्यांमध्ये केलेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी निवृत्त सहायक फौजदार बबन जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच तक्रारीमुळे त्यांना खात्यातून बडतर्फ केले होते. त्यात ते निर्दोष ठरल्यामुळे त्यांना सन्मानाने पुन्हा सेवेत घेण्याचे आदेशही बजावले होते. सेवेत आल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.व्ही. रणपिसे यांनी पोलीस आयुक्त एम.एन. सिंग (आता निवृत्त), अहमद जावेद, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.पी. गुप्ता, उपायुक्त विश्वास साळवे (निवृत्त), सहायक पोलीस आयुक्त विलास शिंदे आणि गृह विभागाचे कक्ष अधिकारी पी.एम. वानखेडे या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध १५६ (३)नुसार गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश डिसेंबर २०१४मध्ये दिले होते. त्यानंतर अहमद यांनी गुन्हा दाखल न करण्याबाबत न्यायालयातून ५ डिसेंबर रोजी स्थगिती मिळविली होती.