ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि.05 - जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षांसह अनेक दिग्गजांना जोरदार झटका बसला आहे. यात विद्यमान सभापती शरद नवले भाग्यवान ठरले असून, त्यांचा गट खुला झाला आहे.अध्यक्ष मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, तसेच बाबासाहेब दिघे, नंदा वारे, मिरा चकोर या सभापतींचे गट आरक्षित झाले आहेत. याशिवाय बाळासाहेब हराळ, अॅड. सुभाष पाटील, संभाजी दहातोंडे यांचे गट महिलांसाठी राखीव झाले आहेत, तर काही सदस्यांच्या गटातील हक्काचे गाव आणि मतदार अन्य गटांना जोडले गेल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गटनिहाय आरक्षण असे : अकोले तालुका :समशेरपूर- सर्वसाधारण महिला, देवठाण- सर्वसाधारण, धामणगाव आवारी : सर्वसाधारण, राजूर- सर्वसाधारण महिला, सातेवाडी- सर्वसाधारण, कोतूळ- सर्वसाधारण.संगमनेर तालुका : समनापूर- सर्वसाधारण, वडगाव पान- सर्वसाधारण, आश्वी बु. - सर्वसाधारण महिला, जोर्वे - अ.जमाती महिला, घुलेवाडी : सर्वसाधरण, धांदरफळ - ना.मा.प्र., संगमनेर खुर्द - ना.मा.प्र., बोटा - ना.मा.प्र., राजूर - सर्वसाधारण महिला.कोपरगाव तालुका : सुरेगाव - सर्वसाधारण, ब्राह्मणगाव - सर्वसाधारण महिला, वारी - अ.जा.महिला, शिंगणापूर - सर्वसाधारण, चांदेकसारे - ना.मा.प्र. महिला.राहाता तालुका : पुणतांबा - अ.जमाती, वाकडी - ना.मा.प्र. महिला, साकोरी - सर्वसाधारण महिला, लोणी खु. - ना.मा.प्र. महिला, कोल्हार बु. - अनुसुचित जमाती.श्रीरामपूर तालुका : उंदीरगाव - अनुसूचित जमाती महिला, टाकळी भान - अनुसूचित जमाती महिला, दत्तनगर - सर्वसाधारण महिला, बेल्हापूर - सर्वसाधारण.नेवासा तालुका : बेलपिंपळगाव - सर्वसाधारण, कुकाणा- ना.मा.प्र. महिला, भेंडा बु.- ना.मा.प्र., भानसहिवरे- अ.जा. महिला, खरवंडी- ना.मा.प्र., सोनई- अ.जा.महिला, चांदा- ना.मा.प्र. महिला.शेवगाव तालुका : दहिगाव-ने -सर्वसाधारण महिला, बोधेगाव- अ.जा. महिला, लाड जळगाव- सर्वसाधारण, भातकुडगाव- अनुसूचित जमाती.पाथर्डी तालुका : कासार पिंपगाव- सर्वसाधारण, भालगाव- सर्वसाधारण, माळी बाभुळगाव- ना.मा.प्र., मिरी -ना.मा.प्र., टाकळी मानूर- ना.मा.प्र. महिला.नगर तालुका : देहरे- ना.मा.प्र., जेऊर- ना.मा.प्र. महिला, नागरदेवळे- सर्वसाधारण, दरेवाडी- ना.मा.प्र., निंबळक- सर्वसाधारण, वाळकी- सर्वसाधारण महिला.राहुरी : टाकळीमियाँ - अ.जमाती महिला, ब्राह्मणी- अ.जमाती, सात्रळ- सर्वसाधारण, बारागाव नांदूर- ना.मा.प्र., वांबोरी- सर्वसाधारण.पारनेर : ढवळपुरी- सर्वसाधारण, कान्हूरपठार- सर्वसाधारण, टाकळी ढोकेश्वर- ना.मा.प्र., निघोज- सर्वसाधारण, सुपा- सर्वसाधारण.श्रीगोंदा : येळपणे- ना.मा.प्र. महिला, कोळगाव- सर्वसाधारण महिला, मांडवगण- सर्वसाधारण महिला, आढळगाव- सर्वसाधारण महिला, बेलवंडी- सर्वसाधारण महिला, काष्टी- सर्वसाधारण.कर्जत : मिरजगाव- सर्वसाधारण, कारेगाव- ना.मा.प्र.महिला, कुळधरण- अ.जाती, राशीन- अ.जाती.जामखेड : खर्डा- अ.जाती महिला, जवळा- अ.जाती.