मुंबई : पाकिस्तानी कलाकाराचा समावेश असल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मल्टीप्लेक्सना पुरेशी सुरक्षा पुरविली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी निर्माता संघटनेला दिल्याने दिग्दर्शक करण जोहरचा जीव तूर्त भांड्यात पडला आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या चित्रपटाला विरोध कायम असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर २८ आॅक्टोबरला देशभरात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे भवितव्य अद्याप अंधारात आहे. उरी येथील लष्कराच्या तळावर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाक कलाकारांना भारतात काम करण्यास विरोध होत आहे. करण जोहरच्या ‘ऐ दिल हल्ल्यानंतर, दोन्ही देशांत तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाक कलाकारांना भारतात काम करण्यास विरोध होत आहे. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाक कलाकार फवाद खानची भूमिका असल्याने त्याला मनसेने विरोध केला आहे. तर एक पडदा चित्रपटगृह चालकांनीही हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महानगरातील मल्टीप्लेक्स चालकांनी चित्रपट प्रदर्शनाची तयारी दर्शविली आहे. यासंदर्भात चित्रपट निर्माता संघटनेचे अध्यक्ष मुकेश भट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन ‘मल्टीप्लेक्स’ला संरक्षण देण्याची विनंती केली. फॉक्स स्टार इंडियाचे सीईओ विजय सिंह, मामि फिल्म फेस्टिव्हलचे चोप्रा, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर त्यात होते. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची टीमही सोबत होती. आयुक्तांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बिघडू देणार नाही, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)>पाक कलाकारांना घेणार नाही‘ ऐ दिल..’च्या प्रदर्शित होण्याच्या अडचणी वाढल्या असताना दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाला विरोध न करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले आहे. पुढच्या चित्रपटात आपण पाकच्या कलाकारांना घेणार नाही. या चित्रपटाला विरोध करू नये, कारण त्याच्यासाठी ३०० कलाकार झटले आहेत. त्यांच्या मेहनतीचा विचार करावा, अशी सर्व देशवासियांना विनंती आहे, असे आवाहन त्याने व्हिडीओद्वारे केले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीदेशातील नागरिकांत पाकविरोधी वातावरण असून निर्मात्यांनीही त्यांचा आदर राखावा, चित्रपटगृह चालकांप्रमाणे मल्टीप्लेक्सवाल्यांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका घ्यावी. आम्हाला सार्वजनिक शांतता बिघडवायची नाही. मात्र चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही.- अमेय खोपकर, अध्यक्ष, मनसे चित्रपट सेना‘योग्य संरक्षण पुरवू’चित्रपट निर्मात्यांच्या मागणीनुसार चित्रपट प्रदर्शित करण्यास योग्य संरक्षण पुरविले जाईल. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर योग्य कारवाई केली जाईल. - अशोक दुधे, पोलीस प्रवक्ते, उपायुक्त अभियानप्रेमाने तोडगा काढावा‘ऐ दिल.’. च्या प्रदर्शन सुरळीतपणे होवून नागरिकांना दिवाळीत आनंदात साजरी करता यावी, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आयुक्तांना भेटून त्यांना विनंती केली आहे. मनसेने आपली भूमिका बदलून प्रेमाने तोडगा काढावा, अशी आमची त्यांच्या नेत्यांना विनंती आहे. - मुकेश भट, अध्यक्ष, चित्रपट निर्माता संघटना
‘ऐ दिल है...’ला पोलीस संरक्षण
By admin | Published: October 19, 2016 7:02 AM