शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

‘टीबी वॉर्ड’च्या जागेवर ‘एम्स’

By admin | Published: August 24, 2014 1:17 AM

देशात नव्याने कार्यन्वित होणाऱ्या चार ‘एम्स’पैकी (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) एक नागपुरातील २०० एकर जागेवर होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या

मेडिकलच्या परिसरात साकारणार रुग्णालय : लघुसिंचन विभागाच्या जागेवर कॉलेजनागपूर : देशात नव्याने कार्यन्वित होणाऱ्या चार ‘एम्स’पैकी (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) एक नागपुरातील २०० एकर जागेवर होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसर, अजनी येथील मेडिकल वसाहत व कारागृहामागील परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंजुरीसाठी या जागेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि नंतर मंत्रिमंडळात पाठविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.‘एम्स’ सुरू करण्याबाबत शासनस्तरावर शनिवारी रविभवन येथे बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘एम्स’ उभारण्यासाठी सहा ते सात जागा सुचविण्यात आल्या होत्या. वर्धा रोडवरील केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र परिसरातील जागेसह अमरावती मार्ग, पूर्व नागपूर, हिंगणा रोडवरील एमआयडीसी परिसर व मेडिकलच्या टीबी वॉर्डाची जागा होती. या सर्वांवर चर्चा झाल्यानंतर मेडिकलच्या टीबी वॉर्डपरिसरातील जागेला प्राधान्य देण्यात आले. टीबी वॉर्डाच्या सुमारे ५५ एकर जागेवर एम्स रुग्णालय, मध्यवर्ती कारागृहामागील व लघु सिंचन विभागाची मिळून सुमारे १३० एकर जागेवर जिथे सागवनाची झाडे व मोकळा परिसर आहे तिथे कॉलेज तर अजनी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मेडिकलची वैद्यकीय वसाहतीच्या १७ एकर जागेवर वसतिगृह व डॉक्टरांचे निवासस्थान उभारण्याचे प्रस्तावित राहील. एम्समुळे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ‘एम्स’चा फायदा विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशातील रुग्णांना होईल. सोबतच वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधनालादेखील चालना मिळेल. गेल्या अनेक वर्षांपासून कोमात गेलेल्या मेडिकल टुरिझमलादेखील नवसंजीवनी मिळेल. या प्रास्ताविक जागेच्या मंजुरीचा प्रस्ताव लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर मंत्रीमंडळा समोर जाईल. या प्रक्लपासाठी केंद्रसरकारने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यसरकारकडून एक रुपयाची मदत घेतली जाणार नाही. बैठकीला आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सहसचिव संदीपकुमार नायक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिव मनिषा म्हैस्कर, मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे व डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते.१२०० खाटांचे एम्सगडकरी म्हणाले, पुण्यातील ‘एम्स’ हॉस्पिटलचे बांधकाम ‘चार एफएसआय’ (चटई क्षेत्र) नुसार झाले आहे. त्याच धर्तीवर नागपुरातील एम्सचे बांधकाम होईल. यात १२०० खाटा राहतील. सुमारे १५०० डॉक्टरांचा समावेश राहील. एमबीबीएसच्या १५० जागा देण्यात येईल. हॉस्पिटलची जागा कमी असल्याने भूगिमत पार्किंगची सोय करण्यात येईल. अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने हे रुग्णालय सज्ज असणार आहे. यामुळे मेडिकल, मेयोवरील रुग्णाचा ताण कमी होईल. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची पाठवैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एम्स’ सुरू करण्याच्या या बैठकीला पाठ दाखविली. यामुळे उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे. ही बैठक शासनाची नव्हे तर गडकरी यांची होती, यामुळे ते आले नसल्याची माहिती आहे.