शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

तत्काळ उपचारासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्स

By admin | Published: January 05, 2017 5:10 AM

आगीच्या दुर्घटनेत अथवा कोणत्याही आपत्तीतील जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी, हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा

मुंबई : आगीच्या दुर्घटनेत अथवा कोणत्याही आपत्तीतील जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी, हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार सुरू आहे. दान केलेले अवयव तत्काळ इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठीही या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर होणार आहे. यासाठी सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्याची सेवा आहे? याची चाचपणी सुरू आहे. शहरातील अनेक जागांची यासंदर्भात पाहणी केली जात आहे. त्यानंतरच इच्छुक कंपन्यांना आवाहन करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देशातील ही पहिली सेवा ठरेल. महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथे केबलमध्ये अडकलेल्या पक्ष्याला वाचवताना अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले. मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहतूककोंडीमुळे या जवानांना ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात नेण्यास विलंब झाला. त्यामुळे राजेंद्र भोजने या जवानाला उपचार मिळण्यास विलंब झाल्याने, गेल्या आठवड्यात त्यांचा मृत्यू झाला. याआधीही अशाच दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टर सेवेची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीची दखल घेऊन ही योजना विचारात घेण्यात आली आहे. जागांचा पर्यायमुख्यत: ओव्हल मैदान, सागरी सेतूकडून वांद्रेच्या दिशेने असलेले मोकळे मैदान, तसेच वांद्रे-कुर्ला संकुल येथील मैदानाचा पर्याय चाचपण्यात येत आहे. त्याचबरोबर, रुग्णालयाच्या गच्चीवरील हेलिपॅडचाही उपयोग होऊ शकेल. खर्च : आगाऊ बुकिंग केलेले हेलिकॉप्टर (हिव्टन इंजिन) एक, तासाचे सव्वा लाख रुपये, सिंगल इंजिनचे तासाला 80000आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त आय. कुंदन यांनी हा आराखडा तयार केला आहे. मात्र, या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबत शंका व्यक्त होत आहे. आर्थिक पेचही सेवा विनामूल्य ठेवण्याचा विचार सुरू आहे. मात्र, अग्निशमन विभाग केवळ आपल्या जखमी जवानांचा खर्च उचलेल. सर्वसामान्य रुग्णांचा खर्च कोण देणार? असा पेच निर्माण झाला आहे.