- नंदकिशोर नारे
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ३ - जिल्ह्यातून जाणा-या राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील सावरगाव बर्डे या गावाला मुर्तीकलेचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. परंतू चार दशकापासून आपल्या कलेची जोपासणा करणा-या कलावंतांना उद्योगवृध्दीसह सधनतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी आजही राजाश्रय मात्र मिळाला नाही.
सावरगावातील मुर्तीकला तशी जूनीच परंतू गत ५ ते १0 वर्षात परंपरागत पध्दतीने मुर्ती बनविण्याच्या कलेला फाटा देवून तेथील मुर्तीकारांना बदलता काळ व मागणीनुसार आपल्या कलेला आधूनिकतेचे रुप देण्याचे काम केले आहे. हस्तकलेतून मुर्तीची निर्मीती हा सावरगावच्या मुर्तीकारांच्या कलेचा गाभा. त्यामुळेच त्यांच्या कलेला पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून चांगली मागणी असते. माहितुनसार वाशिमसह अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ अमरावती , हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यामध्ये सावरगावच्या गणपती व मा दूर्गेच्या मुर्त्या स्थापन्यासाठी नेल्या जातात. ४0 वर्षापासून सावरगावात आपल्या जगतगुरु आर्टच्या माध्यमातून मुर्तीकलेची जोपासना करणाºया पंडूलाल रामचंद्र पेंढारकर यांनी कला जोपासण्यासाठी कराव्या लागणाºया एकूणच कृतीचा उहापोह केला. त्यानुसार पीओपी, मार्बल पावडरसह, शाळू मातीच्या माध्यमातून ते मुर्तीची निर्मीती करतात. मुर्तीसाठी लाकूड, अँगल व नारळीच्या काताचाही वापर केला जातो. मुर्तीच्या निर्मीतीसाठी लागणारे साहित्य ते राजस्थान व पुण्याहून खरेदी करतात. दरवर्षी साधारत: तिसºया महिण्यापासून मुर्तीकलेल्या कामाला ते प्रारंभ करतात. दरदिवशी किमान आठ ते दहा मजूर रात्रंदिवस मेहनत करुन सुबक अशा मुर्त्यांना आकार देतात. गणपती, देविच्या मुर्त्या किमान ५ हजार ते ४५ हजारापर्यंतची विक्री किंमत त्यांच्याकडून ठेवली जाते. परंतू केवळ व्यावसायीकता न जपता कलेची कदर करणाºयांना कमी अधिक रक्कमेत मागणीनुसार गणपती, देवीच्या मुर्त्या बनवून देण्याचे काम मुर्तीकार करतात. केवळ ब्लॉकच्याच नव्हे तर विना ब्लॉकच्याही मुर्त्या बनविण्यात सावरगावच्या पंडूलाल पेंढारकरांचे कसब वाखाणन्याजोगेच आहे. जवळपास प्रत्येकी सव्वाशे ते दिडशे गणपती, दूर्गादेवीच्या मुर्त्या दरवर्षी पश्चिम विदर्भाच्या कानाकोपºयात केवळ सावरगावच्या कलेची कदर करत सहज स्थापनेसाठी नेल्या जातात. गणेशोत्सवाचीही हिच परिस्थीती आहे. पंडूलाल पेंढारकरांप्रमाणेच मनोहर पेंढारकर, अमोल पेंढारकर, सिताराम रोतळे आदी मुर्तीकारही सावरगावची मुर्तीकलेची परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून मेहनतीने जपण्याचे काम करताहेत.
मुर्तीकलानिर्मीतीची कला जोपासण्याचे काम सावरगावचे मुर्तीकार जोमाने करीत असले तरी त्यांना शासनाचा मात्र कुठलाही आधार मिळत नाही. उद्योगाचे स्वरुप पाहता एका मुर्तीकाराला किमान १० ते १५ लाख रुपयाची गुंतवणूक खासगी उसणवारीतून करावी लागते. त्यामुळे उद्योगातूनच आपला उदरनिर्वाह भागवितांना त्यांची चांगलीच परवड होते.