शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...; असीम सरोदेंचा गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 11:00 AM

निर्भय बनो या सभेच्या माध्यमातून असीम सरोदे यांनी गुवाहाटीच्या घडामोडींवर गंभीर आरोप केले आहेत.

धाराशिव - Asim Sarode Allegation ( Marathi News ) दारुच्या नशेत झिंगत असलेले नेते आज जरी सत्तेत बसले असले तरी हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. या २ प्रश्नांचा मागोवा घेतल्यास आज ज्या खुर्चीवर ते बसलेत त्या खुर्च्या हलल्याशिवाय राहणार नाही असं सांगत अँड असीम सरोदे यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप लावला. 

धाराशिव इथं निर्भय बनो या मेळाव्याला संबोधित करताना असीम सरोदे म्हणाले की, गुवाहाटीत ज्याठिकाणी ते थांबले होते. तिथे कुठल्याही इतर ग्राहकांना जाण्याची परवानगी नव्हती. परंतु स्पाईस जेट, इंडिगो या कंपन्यांनी हॉटेलमध्ये आधी रुम्स बुक केल्या होत्या. या कंपन्याचे हॉटेलसोबत वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होते. जिथे वरच्या मजल्यावर काही एअर हॉस्टेस राहत होत्या. त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर हॉस्टेसच्या छातीवर हात कुणी नेले, एअर हॉस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला हे महाराष्ट्राने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यांचे खरे चारित्र्य आपल्यासमोर येईल असा दावा त्यांनी केला. 

तसेच एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला पळून गेले. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये १ आमदार पळून गेले. ८ किमीवर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आले. त्या आमदाराला गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच आणखी एका आमदाराला मारहाण झाली, त्या २ आमदारांना कुणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे. त्यांनी शोधावे असंही असीम सरोदेंनी म्हटलं. 

दरम्यान, भाजपानं महाराष्ट्रासह देशभरात घोडेबाजार सुरू केलाय. अब की बार ४०० पार ही घोषणा जरी भाजपानं दिली असली तरी ते आतून घाबरलेले आहेत. भाजपा सरकार येऊ शकणार नाही हे त्यांना माहिती झालंय. बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र याठिकाणी भाजपाचं लक्ष आहे. कारण या चारही राज्यात इथले प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. त्यामुळे काँग्रेससह प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत अशा ठिकाणी त्यांनी प्रादेशिक पक्ष फोडण्यावर भर दिला. महाराष्ट्रात सर्वात मजबूत असलेली शिवसेना पहिली फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. जशा जशा निवडणूक जवळ येतील अनेक राजकीय पक्ष फोडले जातील असा आरोप सरोदेंनी केला. 

ईडीचा निर्दयीपणे गैरवापर

ईडीचा वापर निर्दयीपणे केलेला आहे. सीबीआयच्या ९५ टक्के केसेस विरोधी पक्षाच्या नेत्यावर झाले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. जेलमध्ये ठेवले. कोर्टात सिद्ध झाले नाही शेवटी अनिल देशमुखांना जामीन मिळाला. संजय राऊतांवर अशाचप्रकारे केसेस टाकल्या. त्यांना जेलमध्ये टाकले. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन दिला असंही सरोदेंनी म्हटलं. 

महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्यांनी मतदानासाठी बाहेर पडावं 

अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावरील गुन्हे सिद्ध होण्यापूर्वीच जेलमध्ये टाकले गेले हा कायद्याचा गैरवापर आहे. कायद्याच्या प्रक्रियेनुसार शिक्षा झाली पाहिजे. कायद्याचा असा वापर होतो तेव्हा नागरिकांनी उभं राहिले पाहिजे. निवडक पद्धतीने कायदाचा वापर केला जातो. देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना काळा चष्मा घातलाय. जे महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांनी मतदानासाठी बाहेर आले पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे असं आवाहनही सरोदेंनी केले आहे. 

टॅग्स :Asim Sarodeअसिम सराेदेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे