ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - एअर इंडिया विमानाचा लॅडिंगवेळी टायर फुटल्याची घटना मुंबई विमानतळावर घडली आहे. विमानात एकूण 128 प्रवासी आणि क्रू मेम्बर्स होते. एअर इंडियाचं AI 614 विमान अहमदाबादहून मुंबईला आले होते. सकाळी 9 वाजता मुंबई विमानतळावर लॅडिंग करत असतानाच विमानाचा टायर फुटला. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
सर्व प्रवासी सुखरुप असून पुढील प्रवासासाठी दुस-या विमानाची सोय करण्यात येत असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्यांनी दिली आहे.