अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 10:00 PM2024-07-06T22:00:22+5:302024-07-06T22:02:23+5:30
"हे सरकार लोकांचे आहे. मी नेहमीच सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे आहे, कष्टकऱ्यांचे आहे, माझ्या माता-भगिनींचे आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचे आहे, ज्येष्ठांचे आहे, वारकऱ्यांचे आहे, सर्वांचे आहे."
आपले सरकार, जनतेचा विचार, विकास आणि श्वास या त्रिसूत्रीवर काम करत आहे. आज लोकांना माहीत आहे की, हे सरकार काम करणारे सरकार आहे. हे सरकार फिल्डवर उतरून काम करणारे सरकार आहे. आता बघा, मी उशिरापर्यंत काम करतो, देवेंद्रजीही उशिरापर्यंत काम करतात. अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात. त्यामुळे २४/७ हे सर्कल सुरू आहे. आता तुम्ही मला कधीही दोन-तीन-चार वाजताही काम करताना पाहू शकता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते बोलत असतानाच, हसत अजित दादा म्हणाले, "सीएम साहेब चालू आहे, म्हणजे काम करायला चालू आहे." यावर सभागृहात एकच हशा पिकला. शिंदे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना व अंमलबजावणीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
... तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे -
कायकर्त्यांसोबत संवाद साधताना शिंदे म्हणाले, "राज्याचे वर्तमान सुधारले आहे. आता भविष्यही उज्वल करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. आपण सर्व जण येथे उपस्थित आहात. आपण आपल्या सरकारची ताकद आहात. म्हणून महायुतीची एकजूट मजबुतीने पुढे न्यायला हवी. आता एकजूट महत्वाची आहे. ती दाखवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा." तसेच, "हे सरकार काम करणारे आहे, हे लोकांनीही मान्य केले आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. ही आपल्यासाठी मोठी, अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे," असेही शिंदे म्हणाले.
#Live |📍षण्मुखानंद सभागृह, मुंबई 🔸06-07-2024
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2024
📡📝शासकीय योजना व अंमलबजावणी संदर्भात राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून लाईव्ह https://t.co/kRDF1m2tZC
आम्ही पहिल्या कॅबिनेटचा निर्णयही शेतकऱ्यांसाठीच घेतला -
"हे सरकार लोकांचे आहे. मी नेहमीच सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे आहे, कष्टकऱ्यांचे आहे, माझ्या माता-भगिनींचे आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचे आहे, ज्येष्ठांचे आहे, वारकऱ्यांचे आहे, सर्वांचे आहे. गेली दोन वर्षे आपण पाहिले तर, आमच्या कॅबिनेटमध्ये एकहि निर्णय वैयक्तिक लाभाचा घेतलेला नाही. सुरुवातीला मी आणि देवेंद्र फडणवीस होतो, आम्ही पहिल्या कॅबिनेटचा निर्णयही शेतकऱ्यांसाठीच घेतला. आम्हाला वैयक्तीक काहीच नाही. केवळ या राज्यातील सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. माझ्या राज्यातील शेतकरी, माता भगिणी यांना चांगले दिवस यायला हवेत. त्यांच्या आयुष्यात बदल घडायला हवा," असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.