गेल्या काही दिवसांपासून राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांना जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली होती. यावर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याचे पटेलांनी स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस अजित पवारांना वैद्यकीय निरीक्षण आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. ते पूर्णपणे बरे झाले की पुन्हा आपल्या कर्तव्यांवर परततील, असे पटेल यांनी म्हटले आहे. अजित पवार नाराज असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी देखील अजित पवार आजारी होते, तेव्हा देखील ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर गेल्याच महिन्यात अजित पवारांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी लावली होती. तेव्हा ते खरोखरच नाराज होते. पालकमंत्रीपद वाटली जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिंदे-फडणवीस लगोलग दिल्लीला गेले होते, तिथून त्यांनी पालकमंत्री पदाचे आदेश आणले होते.