ठाणे : कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या बाळगंगा प्रकल्प गैरव्यवहाराच्या चौकशीला तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुनील मुसळे व वकील कार्लोस यांनी हजेरी लावली. पवार यांना २२ सप्टेंबर रोजी पुन्हा चौकशीकरिता बोलावले आहे.मंगळवारी तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून पाटील आले होते. त्या वेळी कोंडाणे प्रकल्पासंदर्भात जी प्रश्नावली दिली आहे, त्या अनुषंगाने स्पष्टीकरण व माहिती देण्याकरिता तटकरेंना पुन्हा २१ सप्टेंबर रोजी ठाणे लाचलुचपत विभागात हजर राहण्याबाबत लेखी आदेश देण्यात आले. तर, बुधवारी चौकशीला दांडी मारणाऱ्या अजित पवार यांना बाळगंगा प्रकल्पासंदर्भात चौकशीकरिता २२ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याबाबत सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी) खत्री, कासटला न्यायालयीन कोठडीअटक केलेल्या निसार खत्री व विजय कासट यांनी जामिनाकरिता अर्ज केला असून, त्याची सुनावणी बुधवारी विशेष न्यायालयासमोर झाली. याबाबतची पुढील सुनावणी शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवार अनुपस्थित
By admin | Published: September 17, 2015 1:31 AM