शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकीवरून अजित पवार आक्रमक, म्हणाले, पवार साहेबांचं संरक्षण करण्यास...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 02:14 PM2023-06-09T14:14:21+5:302023-06-09T14:19:24+5:30

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ट्विटरवरून धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या धमकी प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar aggressive on the threat given to Sharad Pawar, said, to protect Mr. Pawar... | शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकीवरून अजित पवार आक्रमक, म्हणाले, पवार साहेबांचं संरक्षण करण्यास...

शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकीवरून अजित पवार आक्रमक, म्हणाले, पवार साहेबांचं संरक्षण करण्यास...

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ट्विटरवरून धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या धमकी प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांना सोशल मीडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार...’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल. आदरणीय पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही. पवार साहेबांना सोशल मिडियावरुन देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी, या मागणीचा मी पुनरुच्चार करतो, असे अजित पवार यांनी संगितले. 

Web Title: Ajit Pawar aggressive on the threat given to Sharad Pawar, said, to protect Mr. Pawar...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.