शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
5
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
6
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
7
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
8
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
9
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
10
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
11
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
12
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
13
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
14
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
15
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
17
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
18
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
19
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

अजित पवार आणि भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; ओबीसी आरक्षणावरून बैठकीत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 8:42 PM

Ajit Pawar VS Chagan Bhujbal: भुजबळ यांनी मंत्रालयात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी बैठकीत मांडली. यावर अजित पवारांनी आक्षेप घेतला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर येत आहे. ओबीसींच्या मागण्यांवरून सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत भुजबळ आणि पवार यांच्यात मतभेद झाल्याचे समजते आहे. 

ओबीसी आरक्षणानुसार सरकारी नोकऱ्यांची आकडेवारी भुजबळ यांनी सादर केली. ही आकडेवारी अजित पवारांना अमान्य झाल्याचे समोर येत आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तर ते न करण्यासाठी ओबीसी समाजाकडून राज्यभर आंदोलने सुरु आहेत. याच मुद्द्यांवरुन ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. 

भुजबळ यांनी मंत्रालयात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी बैठकीत मांडली. तसेच ओबीसी समाजाचे कर्मचारी कमी संख्येने मंत्रालयात नेमलेले आहेत, यामुळे ओबीसींवर अन्याय होतोय, असा आरोप भुजबळ यांनी केला. जर ओबीसींसाठी सव्वा पाच लाख जागा असतील तर त्या तितक्या भरल्या गेल्या नाहीत. उलट खुल्या प्रवर्गातून जास्त प्रमाणात भरती करण्यात आली आहे, असे भुजबळ म्हणाले.

यावर छगन भुजबळ यांनी मांडलेली अशी कोणतीही आकडेवारी खरी नाही. तशी आकडेवारी असेल तर दाखवून द्यावी, असे आव्हान अजित पवार यांनी दिले. भुजबळांनी ही सगळी माहिती दिल्यानंतर मी मुख्य सचिवांशी चर्चा केली. त्यांनी मला सगळी माहिती दिलीय. अशा पद्धतीची भरती झाली नाही. त्यामुळे या आकड्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही, असे पवार म्हणाले. यावरून ही बाचाबाची झाल्याचे सुत्रांनी सांगितले. पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बैठकीत काही क्षणासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारOBC Reservationओबीसी आरक्षण