शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
5
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
6
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
7
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
8
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
9
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
10
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
11
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
12
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
13
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
14
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
15
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
16
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
17
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
18
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
19
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
20
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत

अजित पवार, गणेश नाईक दोघेच 'डबल लक्षाधीश'; विधानसभा निवडणुकांमध्ये असेही रेकॉर्ड

By यदू जोशी | Published: October 23, 2024 1:33 PM

एक लाखांहून अधिक मताधिक्याने आजवर राज्यात ११ वेळा विजय

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यावेळी पुन्हा भाजपकडून उमेदवारी मिळालेले माजी मंत्री गणेश नाईक हे महाराष्ट्राच्या इतिहासातील दोनच नेते असे आहेत की जे एक लाखाहून अधिक मतांनी दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले.

आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात ११ वेळा एक लाखांहून अधिकच्या मतफरकाने विधानसभेत विजय मिळविण्यात आला. अजित पवार हे बारामती मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आले आहेत. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी १ लाख २ हजार ७९७ मतांनी विजय मिळविला होता. त्यांना १ लाख २८ हजार ५४४ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष रंजनकुमार तावरे यांना २५ हजार ७४७ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार १ लाख ६५ हजार २६५ मतांनी जिंकले. हा आजवरचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रेकॉर्ड आहे. त्यावेळी विरोधात होते भाजपचे गोपीचंद पडळकर; त्यांना ३० हजार ३७६ मते मिळाली होती.

वडील, मुलगा लाखाहून अधिकच्या फरकाने जिंकले!

  • माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम आणि त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. पिता-पुत्र लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्याचे राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे.
  • डॉ. पतंगराव कदम हे २००४ मध्ये सांगली जिल्ह्याच्या भिलवडी वांगी मतदारसंघातून १ लाख १ हजार ९०० मतांनी विजयी झाले होते. डॉ. कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी २०१९ मध्येच पोटनिवडणूक झाली होती. 
  • पलूस कडेगावच्या २०१९ मधील या  पोटनिवडणुकीत डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित हे १ लाख ६२ हजार ५२१ मतांनी विजयी झाले होते.

एक लाखाहून अधिक मतांनी आजवर जिंकलेले उमेदवार

उमेदवार    मतदारसंघ (पक्ष)    वर्ष    मताधिक्य

  • डॉ. पतंगराव कदम    भिलवडी वांगी (काँग्रेस)    २००९    १,०१,९००
  • अजित पवार    बारामती (राष्ट्रवादी)    २००९    १,०२,७०७ 
  • अजित पवार    बारामती (राष्ट्रवादी)    २०१९    १,६५,२६५ 
  • विजयसिंह मोहिते पाटील    माळशिरस (राष्ट्रवादी)    २००४    १,०४,७१२ 
  • शिवेंद्रराजे भोसले    सातारा (राष्ट्रवादी)    २००९    १,०५,७७८ 
  • अशोक चव्हाण    भोकर (काँग्रेस)    २००९    १,०७,५०३ 
  • गणेश नाईक    बेलापूर (शिवसेना)    १९९५    १,०९,००१ 
  • गणेश नाईक    बेलापूर (राष्ट्रवादी)    २००४    १,१८,२७६  
  • धीरज देशमुख    लातूर ग्रामीण (काँग्रेस)    २०१९    १,२१,४८२ 
  • किसन कथोरे    मुरबाड (भाजप)    २०१९    १,३६,०४० 
  • विश्वजित कदम    पलूस कडेगाव (काँग्रेस)    २०१९    १,६२,५२१
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारGanesh Naikगणेश नाईकbaramati-acबारामतीairoli-acऐरोली