"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 02:07 PM2024-10-11T14:07:34+5:302024-10-11T14:08:43+5:30

अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं. राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हाला होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

"Ajit Pawar and Prakash Ambedkar should come together", NCP leader Amol Mitkari's big statement | "अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

अकोला : राज्याच्या सध्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं, असं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे. 

अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं. राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हाला होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे आणि वैचारिक वारसदार, तर अजित पवार हे शिव-शाहू फुले-आंबेडकरांच्या विचारांचे वैचारिक वारसदार असल्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, यासाठी मध्यंतरी आपण प्रयत्न केले होते. मात्र त्याला दोन्हीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं ते प्रयत्न थांबवले होते. आता आपण शेवटच्या श्वासापर्यंत हे दोन्ही नेते एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सोडणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तसेच, १३ ऑक्टोबर रोजी अकोला प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थित अकोल्यात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्वागतासाठी अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकरांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लागल्यानेही चर्चा रंगली आहे. 

एकीकडे महायुतीमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतानाच अमोल मिटकरी यांनी केलेल्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उठून गेल्याची चर्चा होती. यावर अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवार महायुतीमध्ये नाराज नाहीत, जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये खटका उडवल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खोट्या बातम्या पसरवण्याचे उगमस्थान तुतारी गट तसेच मविआतून आहे. 

जाणीवपूर्वक अजित पवार आणि महायुती सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली. याशिवाय, ते म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघातील जनतेचा आपल्यावर उमेदवारीसाठी दबाव आणि आग्रह आहे. सध्याच्या भाजप आमदारांबद्दल लोकमानसामध्ये नाराजीची भावना असल्याची जनतेची माहिती आहे. अकोट ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यामुळे मला अकोट मतदारसंघातून लढायचं आहे. याबद्दल पक्षाध्यक्ष अजित दादांकडे म्हणणं मांडणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितलं. 

Web Title: "Ajit Pawar and Prakash Ambedkar should come together", NCP leader Amol Mitkari's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.