"महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही", अजित पवारांनी CM बोम्मई यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:39 PM2022-11-24T12:39:15+5:302022-11-24T12:40:31+5:30

"कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा-तसा वाटला का?"

Ajit Pawar angrily slams Karnataka CM Basavaraj Bommai over controversial comments related to villages of Maharashtra | "महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही", अजित पवारांनी CM बोम्मई यांना सुनावलं

"महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही", अजित पवारांनी CM बोम्मई यांना सुनावलं

googlenewsNext

Ajit Pawar warning Karnataka CM Basavaraj Bommai | तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का?, असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत असून या बैठकीला ते आले. त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले होते. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर, महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आज अजित पवार यांनी मत व्यक्त केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बोम्मई कडक शब्दात सुनावले पाहिजे!

"सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्याचा निषेध करतो. लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे," असे अजित पवार म्हणाले.

"प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे. केंद्रानेही यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही", असे अजित पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघणे कितपत योग्य?

आम्ही शिर्डीला गेलो. पंढरपूर येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो मात्र ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात... काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून अशा शब्दात अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Web Title: Ajit Pawar angrily slams Karnataka CM Basavaraj Bommai over controversial comments related to villages of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.