कर्नाटकात शिवरायांच्या प्रतिमेच्या झालेल्या विटंबनेमुळे अजित पवार संतप्त, म्हणाले, अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 04:37 PM2021-12-18T16:37:22+5:302021-12-18T16:38:05+5:30

Ajit Pawar News: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे.

Ajit Pawar angry over desecration of Shivratri's image in Karnataka, says country will not forgive those who protect such incidents | कर्नाटकात शिवरायांच्या प्रतिमेच्या झालेल्या विटंबनेमुळे अजित पवार संतप्त, म्हणाले, अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही

कर्नाटकात शिवरायांच्या प्रतिमेच्या झालेल्या विटंबनेमुळे अजित पवार संतप्त, म्हणाले, अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही

googlenewsNext

मुंबई - “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावं, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

Web Title: Ajit Pawar angry over desecration of Shivratri's image in Karnataka, says country will not forgive those who protect such incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.