अजित पवार राजकारणापासून लांब; दुपारीच बारामतीत होते, सायंकाळी वानखेडेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 05:13 PM2023-11-15T17:13:48+5:302023-11-15T17:23:32+5:30
मंगळवारी रात्री अजित पवार हे शरद पवारांच्या गोविंद बागेत आले होते. त्यापूर्वी राज्यभरातून कार्यकर्ते येत असताना अजित पवार हे काटेवाडीत दिवाळी निमित्त उभारलेले किल्ले पाहत फिरत होते.
एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे भाऊबीजेला अजित पवारांच्या घरी गेलेले असताना अजित पवार थोड्याच वेळात बारामतीतून थेट मुंबईत पोहोचले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून डेंग्यूमुळे राजकारणापासून लांब असलेले अजित पवार पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी रात्री अजित पवार हे शरद पवारांच्या गोविंद बागेत आले होते. त्यापूर्वी राज्यभरातून कार्यकर्ते येत असताना अजित पवार हे काटेवाडीत दिवाळी निमित्त उभारलेले किल्ले पाहत फिरत होते. डेंग्यूमुळे विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी सांगितलेला असताना अजित पवार हे आज थेट भाऊबीज आटोपून मुंबईला परतले आहेत.
अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे भारत वि. न्यूझीलंड सामन्याचा आनंद घेत आहेत. कोहली आणि श्रेयस अय्यरच्या जोरदार फटकेबाजीवर टाळ्या वाजवत आहेत. नेहमी राजकीय दौरे, कार्यक्रम, सरकारी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेले अजित पवार हे मिळालेल्या आजारी सुट्टीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.
अजित पवारांच्या घरी आज पवार कुटुंबीयांची भाऊबीज साजरी करण्यात आली. अजित पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, अजित पवारांच्या दोन बहिणी, रणजित पवार, जयंत पवार हे एकत्र आले होते.