नागालँडमध्ये भाजपसोबत जाण्याच्या निर्णयात माझा सहभाग नाही. तो वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे. मी राज्यातील निर्णय प्रक्रियेत सहभागी असतो. शरद पवारांनी टीव्ही चॅनेलला सांगितले, त्यावर आम्ही खाली वक्तव्ये करत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर अर्थसंकल्पावर अजित पवारांनी आपले मत मांडले. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असावा. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अर्थसंकल्प असावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंसोबत जो गट गेला त्यांना काहीतरी कारण हवे होते. गेल्या अर्थसंकल्पावेळी ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांची कामे मंजूर केली. यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते, पूल आदी कामे होती, असे सांगत अजित पवारांनी निधी वाटपाच्या शिंदे गटाच्या आरोपांवर खुलासा केला आहे.
परवाची पुरवणी मागणी आली त्यातील ८३ टक्के रक्कम देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांना गेली आहेत. शिंदे गटाला १७ टक्केच निधी मिळाला आहे. शेवटी तुमच्याकडे विभाग कोणते आहेत, त्यावर ते अवलंबून असते. असे काही विभाग आहेत त्यांना पैसे द्यावेच लागतात, असे पवार म्हणाले.