मुंबई - खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ज्यांना ढाण्या वाघाची उपमा दिली अशा वंचित बहुजन विकास आघाडीतून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध बारामतीतून लढण्याचे संकेत दिले होते. परंतु, महायुतीची घोषणा झाल्यानंतर बहुचर्चित व प्रतिक्षित भाजपची 125 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यात गोपीचंद पडळकर यांचे नाव आले नसल्याने त्यांची उमेदवारी 'वेटिंग'मोडवर असल्याची चर्चा आहे.
पडळकर यांची उमेदवारी जरी वेटिंगवर असली तरी मी बारामतीमधून निवडणूक लढवणार आहे आणि अजित पवारांचा 100 टक्के पराभव मी करू शकतो, असे पडळकर यांनी म्हटले आहे. पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बारामतीमधील वंचित घटकांना सोबत घेऊन अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढणार आहे. तसेच, मी 100 टक्के निवडणूक जिंकू शकतो, असे भाकितच पडळकर यांनी केले. त्यामुळे बारामती विधानसभा ऐनवेळी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अजित पवार यांच्या विरोधात संधी देण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी सोमवारी(दि ३०) बहुजन वंचित आघाडीतून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधुन निवडणुक लढवावी याबाबत पक्षप्रमुखांशी चर्चा करु असे सांगत पडळकर यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत बारामतीची उमेदवारी जाहिर करण्यात आले नसल्याने पडळकर यांची उमेदवारी सध्या तरी लटकल्याचे संकेत आहेत. पण, पडळकर यांना उमेदवारीची खात्री असल्याचं दिसून येतंय.