आम्ही सरकारचे बुरखे टराटरा फाडणार, अजित पवार यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 11:15 AM2018-11-19T11:15:03+5:302018-11-19T11:23:58+5:30

विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.

ajit pawar criticize devendra fadanvis | आम्ही सरकारचे बुरखे टराटरा फाडणार, अजित पवार यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

आम्ही सरकारचे बुरखे टराटरा फाडणार, अजित पवार यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

Next

मुंबई- विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर विरोधी पक्षांतील नेते आक्रमक झाले आहेत. अजितदादा पवारांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महत्त्वाच्या घोषणा अधिवेशनात करायच्या असतात, मागास वर्ग आयोगाचा अहवाल काय आहे, माहीत नाही.

विरोधकांचं म्हणणं सरकार ऐकून घेत नाही. विरोधकांचं म्हणणं विचारात घेऊनच अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे. सरकारच्या अशा भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळणार काय, याबद्दल आम्ही साशंक आहोत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला आहे. घटनेच्या चौकटीत बसून आरक्षण द्यावे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

आता ते केंद्राच्या हातात असल्याचं सांगत आहेत. सरकार शब्दांची फसवणूक करत आहे. आम्ही सरकारचे बुरखे फाडण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले आहेत. दुष्काळाची कोरडी घोषणा नको, शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी 50 हजार आणि फळबाग, ऊस, केळीला लाख रुपये मिळालेच पाहिजेत, असं धनजंय मुंडे म्हणाले आहेत. 

Web Title: ajit pawar criticize devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.