'ते इतक्या वेळी अर्थमंत्री होते, मग...', अजित पवारांचा विधानसभेत जयंत पाटलांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:19 IST2025-03-17T18:17:02+5:302025-03-17T18:19:00+5:30

Ajit Pawar Jayant Patil: अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटलांनी अजित पवारांना चिमटे काढले होते. त्याला आज अजित पवारांनी उत्तर दिले. 

Ajit Pawar criticized Jayant Patil, saying that it is wrong to speak harshly. | 'ते इतक्या वेळी अर्थमंत्री होते, मग...', अजित पवारांचा विधानसभेत जयंत पाटलांवर पलटवार

'ते इतक्या वेळी अर्थमंत्री होते, मग...', अजित पवारांचा विधानसभेत जयंत पाटलांवर पलटवार

Ajit Pawar News: विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा झाली. विधानसभा सदस्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी उत्तर दिले. विधानसभेत बोलताना अजित पवारांनी सुरूवातीलाच जयंत पाटलांना लक्ष्य केले. उपरोधात्मिक कौतुक करतात, पण शरण जाणं म्हणणं बरोबर नाहीये, अशा शब्दात पलटवार केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटलांनी मंत्र्यांना आता अजित पवारांना शरण झाण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटले होते. याच विधानाला अजित पवारांनी उत्तर दिले.    

बाकीच्या मंत्र्यांनी शरण जायचं असतं का? पवारांचा पाटलांना सवाल

अजित पवार म्हणाले, "जयंतराव आता नाहीये. पण, जयंत पाटील नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक प्रकारची उपरोधात्मिक झालर देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आज ते नाहीत. त्यांनी बोलत असताना सदस्यांनी ऐकलं असेल. 'आता सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही.' मला एक कळत नाही. ते इतक्या वेळी अर्थमंत्री होते. मग अर्थमंत्री ज्यावेळी अर्थसंकल्प सादर करतात. त्यावेळी बाकीच्या मंत्र्यांनी शरण जायचं असतं का?", असा उलट सवाल अजित पवारांनी जयंत पाटलांना केला. 

बातम्या रंगवण्याचा प्रयत्न -अजित पवार

"खरंतर त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून अशाप्रकारची अपेक्षा नाही. शरण जाणं किंवा इतर काही शब्दांचा उल्लेख करणं. अध्यक्ष महोदय, हे काही बरोबर नाही. शेवटी आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी किंवा आमच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आम्ही सगळे सांगतो की आमच्या एकी आहे. आमच्यात काही वाद नाहीये. परंतू वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला काही अर्थ नाही", अशी टीका अजित पवारांनी जयंत पाटलांवर केली. 

"काहींनी अशी पण टीका केली की,  'बडा घर पोकळ वासा'. काहीजण म्हणाले, 'मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी' असंही काहींचं म्हणणं आहे. काही जण पहिल्यांदाच आमदार झालेत किंवा अर्थकारणाची त्यांना जास्त माहिती नसेल, म्हणून त्यांनी तसे वक्तव्य केले असेल", असे टोला अजित पवारांनी लगावला.  

Web Title: Ajit Pawar criticized Jayant Patil, saying that it is wrong to speak harshly.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.