संदीप आडनाईक कोल्हापूर : महाविकास आघाडीतील अवघे सात मंत्री वगळता बाकी सर्वच्या सर्व ३६ मंत्री सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर तब्बल २० लाख फॉलोअर्ससह पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये सर्वांत पुढे आहेत.फेसबुकवर पाच लाख २३ हजार फॉलोअर्ससह ‘दादा’ असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार सोशल टिष्ट्वटरवर पाच लाख २१ हजार फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकवरआदित्य ठाकरे यांच्या तुलनेत पवारांच्या फॉलोअर्सची संख्या एक चतुर्थांशांपेक्षा थोडी जास्त आहे
ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्ससह टॉप १० मंत्र्यांमध्ये निम्मे म्हणजे तब्बल पाच मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा यात समावेश आहे. वनमंत्री संजय राठोड (शिवसेना) हे फेसबुक आणि टिष्ट्वटरवर नाहीत. निवडणूक शपथपत्रात सोशल मीडियाशी संबंधित माहिती राठोड यांनी निरंक दाखविली आहे.आदित्य ठाकरे : २० लाख । अजित पवार : ५ लाख २१ हजारधनंजय मुंडे : ३ लाख ५५ हजार । जितेंद्र आव्हाड : २ लाख १३ हजार जयंत पाटील : १ लाख ७३ हजार । उद्धव ठाकरे : १ लाख ५७ हजार अशोक चव्हाण : १ लाख ४८ हजार । नवाब मलिक : १ लाख २० हजार एकनाथ शिंदे : ८२ हजार । बाळासाहेब थोरात : ६४ हजारफेसबुकवर एकाचा अपवाद वगळता सर्व ४२ मंत्री सक्रिय आहेत. फेसबुकवर सरकारच्या मंत्रिमंडळातील निम्मे म्हणजे तब्बल पाच मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. याशिवाय यात शिवसेनेच्या तीन आणि काँग्रेस व ‘प्रहार’च्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे.
फेसबुकवरील टॉप १० मंत्री
- अजित पवार : ५ लाख २३ हजार ३१९
- धनंजय मुंडे : ४ लाख ५३ हजार १७५
- बच्चू कडू : ४ लाख ३८ हजार ४३८
- एकनाथ शिंदे : ३ लाख ३५ हजार ०७०
- जितेंद्र आव्हाड : २ लाख ४६ हजार ५४०
- जयंत पाटील : २ लाख ०१ हजार ६९२
- आदित्य ठाकरे : १ लाख ८९ हजार ३६८
- सतेज पाटील : १ लाख ६८ हजार ८५५
- दिलीप वळसे : १ लाख ५४ हजार ३०८
- उद्धव ठाकरे : १ लाख ५३ हजार ७४०