रत्नागिरी : तालुक्यात सहा शाळा शून्य शिक्षकी असून, शिक्षकांची ८८ पदे रिक्त असल्याने शैक्षणिक विकासाचे बारा वाजले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक दर्जा वाढीसाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु असून, त्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून प्रयोग केले जात आहेत. शिक्षणाच्या विविध उपक्रमांवर शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, शिक्षक भरती न करता असलेल्या शिक्षकांना कामगिरीवर काढण्याचे शासनाचे धोरण शैक्षणिकदृष्ट्या मारक ठरत आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थी कमी, पण शिक्षकांची संख्या जादा असतानाही त्यांना जादाकडून कमीकडे वळवता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे, अशी एकूण स्थिती आहे.जिल्ह्यातील अन्य तालुक्यांचीही हीच स्थिती आहे. प्रत्येक तालुक्यात रिक्तपदांची मोठी यादीच आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे केवळ गरिब विद्यार्थ्यांचाच ओढा राहिला आहे. रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर विविध विषयांची जबाबदारी येऊन पडली असून त्यांना तारेवरची कसरत करतच ज्ञानार्जन करावे लागत आहे. शासनाने उदासिनता दाखवत या पदभरतीकडे दुर्लक्ष केल्याने कित्येक महिने ही पदे रिक्तच आहेत.रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३३६ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये उपशिक्षकांची ६८४ आणि पदवीधरांची २०९ पदे मंजूर आहेत. मात्र, तालुक्यात उपशिक्षकांची ७६ पदे, तर पदवीधर शिक्षकांची १२ रिक्त आहेत. त्यामुळे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत शिक्षकांची संख्या अधिक असूनही गटशिक्षणाधिकाऱ्यांना कामगिरीवर काढता येत नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित पाहता ३२ शिक्षकांना कामगिरीवर काढणे आवश्यक आहे. मात्र, शासनाचे नियम आड येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीपर्यंत असलेल्या ६ शाळा शून्यशिक्षकी आहेत.या शाळांवर केंद्रातीलच शिक्षक देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले जात आहेत. शून्य शिक्षकी नसल्याने या शाळांमधील शिक्षक नेहमीच बदलते ठेवण्यात आले आहेत. याबाबत पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी यांनी वेळोवेळी शिक्षण विभागाकडे शिक्षक देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. (शहर वार्ताहर)रत्नागिरी तालुक्यात शिक्षकांची ८८ पदे रिक्त.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३३६ प्राथमिक शाळा.उपशिक्षकांची ६८४, तर पदवीधरांची २०९ पदे मंजूर.उपशिक्षकांची ७६, तर पदवीधरांची १२ पदे रिक्त.कमी विद्यार्थीसंख्येच्या काही शाळांवर जादा शिक्षक.शून्यशिक्षकी शाळा विद्यार्थी संख्याशाळेचे नावविद्यार्थी संख्यानाखरे खांबड२निवळी बौध्दवाडी६वेतोशी क्र. ४८संदखोल१२नांदिवडे-आंबुवाडी१९मालगुंड तळेपाट क्र. २१५
अजित पवार गोत्यात
By admin | Published: July 16, 2015 12:21 AM