महाविकास आघाडीनं अजित पवारांकडे दिली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:40 AM2020-02-25T02:40:42+5:302020-02-25T06:45:43+5:30
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच पवार यांच्या नावाची घोषणा केली.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच पवार यांच्या नावाची घोषणा केली. याआधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. २०२०मध्ये विधानपरिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.
जून २०२० मध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदार महाविकास आघाडीतर्फे निवडले जातील. विधान परिषदेतील भाजपची सदस्य संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारा नेत्याची आवश्यकता होती. सुभाष देसाई हे मवाळ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उलट अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात.