शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

"एकीकडे प्रेतं जळत होती अन् दुसरीकडे हे लोक पेढे वाटत होते, महाराष्ट्रात असं घडणं म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 10:03 AM

समृद्धी महामार्गावरील अपघाताला २४ तासही झाले नसताना, राज्यात शपथविधी पार पडल्याने राऊतांचा संताप

Sanjay Raut on Ajit Pawar, Maharashtra Political Crisis: अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना राजभवनावर शपथविधीचा सोहळा पार पडला हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण आहे. मृतांच्या यादीत बारामतीमधले तीन लोक होते. विदर्भातील लोकांची प्रेतं पडलेली होती. पण २४ तास या दुर्घटनेला व्हायच्या आधीच एकीकडे प्रेतं जळत असताना, राजभवनात हे लोक पेढे वाटत होते, फटाके वाजवत होते, शपथा घेत होते. महाराष्ट्राने इतकं निर्घृण राजकारण या आधी कधीही पाहिलेलं नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या शपथविधी सोहळ्यावर भाष्य केलं.

"या लोकांना शपथविधीची घाई होती, पण त्यांनी थोडं थांबायला हवं होतं. शपथविधीची इतकी धावपळ का केली. काल राज्याने जे चित्र पाहिलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं चित्र होतं. महाराष्ट्रावर संकट कोसळलं, २५-२६ जणांचा मृत्यू झाला, सामुदायिक अंत्यसंस्कार सुरू होते, त्याच वेळी या लोकांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची घाई लागली होती. हा काय प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. भाजपा महाराष्ट्राला कलंक लावत आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व आणि नाव पुसण्याचा खेळ सुरू आहे, या लोकशाहीला न परवडणारा खेळ आहे," अशी टीका केली.

अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप हे पक्ष आपापल्या नेत्यांच्या बैठका घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात आता नवा मुख्यमंत्री होणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. एकनाथ शिंदे यांना हटवले जाईल. अपात्रतेच्या केसमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील. यामुळे इतक्या घाईगडबडीत अजित पवारांना सोबत घेतले आहे. त्यामुळे आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाbuldhanaबुलडाणा