विधानसभा निवडणूक निकाल: अजित पवारांना 50 हजारांची लीड; गोपीचंद पडळकर अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:49 AM2019-10-24T10:49:41+5:302019-10-24T10:51:28+5:30
अजित पवारांनी घेतलेली लीड लक्षात घेता भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव निश्चित समजला जात आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत असतानाचा राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून रिंगणात असलेले गोपीचंद पडळकर सध्या पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार 50 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विरोधात पडळकर यांना रिंगणात उतरवून आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. सकाळी 8 वाजेपासून निकालाचे आकडे हाती येत असून, बारामती मतदारसंघात अजित पवारांनी 50 हजारांची लीड घेतली आहे.
अजित पवारांनी घेतलेली लीड लक्षात घेता भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव निश्चित समजला जात आहे. तर ही लीड तोडणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. तर काही तासात बारामती मधील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा अजित पवार हे विजयी होणार की पडळकर एंट्री करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार.