अजित पवारांचं 'पिंक पॉलिटिक्स'; गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 08:08 AM2024-07-20T08:08:02+5:302024-07-20T08:18:15+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष रणनीती आखत आहेत. बैठका आणि मेळाव्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतायेत. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही पुढील ९० दिवसांची रणनीती तयार केली आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकमेव खासदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांसाठी अजितदादा गटानं तयारी आणि रणनीती बनवण्यास सुरूवात केली आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून पक्षाच्या कार्यक्रमात, बॅनर्स, पोस्टर आणि जाहिरातींवर अधिकाधिक गुलाबी रंगाचा वापर केला जाणार आहे.
हा गुलाबी रंग लोकांच्या मनावर आणि कार्यकर्त्यांवर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार हेदेखील दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचं पिंक पॉलिटिक्स पाहायला मिळणार आहे. डिझाईन बॉक्स इनोव्हेशन प्रा.लि कंपनीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रचार कॅम्पेन मॅनेज करण्याचं काम दिलं आहे. या कंपनीच्या सल्ल्यानुसार येणाऱ्या काळात राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा वापर पक्षाच्या व्यासपीठावर, बॅकग्राऊंडवर, बॅनरवर, पक्षाच्या प्रिंट, मीडिया जाहिरातीवर आणि सोशल मीडिया अकाऊंटवर करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुलाबी रंगाचं जॅकेट सरकारी आणि पक्षाच्या बैठकांना घालण्यास सुरुवात केली आहे. दैनंदिन वापरासाठी अजितदादांनी १८ गुलाबी रंगाचे जॅकेट घेतले आहेत. पक्षाकडून सर्व मंत्र्यांना, आमदार, खासदार, जिल्हा पदाधिकारी, ग्रामीण पातळीवर कार्यकर्ते यांना गुलाबी रंगाचा वापर करण्याचा सूचना दिल्या आहेत. गुलाबी हा प्रेम आणि आपुलकीचा रंग आहे असं पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटलं. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी महिला, मुलींसाठी अनेक सवलती, योजना जाहीर करत त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
कोण आहे नरेश अरोरा?
डिझाईन बॉक्स इनोव्हेशन कंपनीचे नरेश अरोरा हे को-फाऊंडर आहेत. त्यांनी राजस्थान, कर्नाटक यासह अनेक राज्यात काँग्रेस आणि इतर पक्षांच्या राजकीय इलेक्शन कॅम्पेनचं काम केले आहे. या कंपनीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काम दिले आहे. त्यानुसार राजकीय रणनीती, प्रचाराचं साहित्य आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी ९० दिवसांची योजना बनवली जात आहे. त्यात अजित पवारांचं ब्रॅडिंग मेक ओव्हर काम केले जाईल. अजित पवारांच्या सकारात्मक बाजू प्रखरतेने जनतेसमोर आणल्या जातील. याआधी नरेश अरोरा यांच्या कंपनीनं कर्नाटकात डि.के शिवकुमार, राजस्थानात अशोक गहलोत यांच्या प्रचाराचं काम केले आ