अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांतून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:54 PM2023-07-05T16:54:58+5:302023-07-05T17:02:18+5:30

Ajit pawar vs Sharad Pawar news अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून दावा केला आहे.

Ajit Pawar NCP President! Resolution approved with 40 mla sign; A big revelation from Election Commission documents | अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांतून मोठा खुलासा

अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांतून मोठा खुलासा

googlenewsNext

अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्यासाठी पुरेपूर तयारी केल्याचे दिसत आहे. अजित पवारांनीशरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना आपणच अध्यक्ष असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिल्याचे समोर येत आहे. यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. 

अजित पवारांची मोठी खेळी! शिंदेंच्या महामार्गाने निघाले; राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा

अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून दावा केला आहे. यासाठी अजित पवारांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून प्रतिज्ञापत्रांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. परंतू त्यापूर्वीच अजित पवारांनी सगळी तयारी करून ठेवली आहे. छगन भुजबळांनी देखील आपल्या भाषणात आम्हाला देखील कायदा कळतो, आम्ही सगळी तयारी करूनच हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. 

अजित पवार यांनी ४० आमदारांच्या ठरावाची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या पत्रावर ३० जून ही तारीख आहे. यावर निवडणूक आयोगाने आपण दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून त्यावर निर्णय देणार असल्याचे म्हटले आहे. आता हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेल्याने शरद पवारांना कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे. याबाबतची माहिती एबीपी माझाने दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी देण्यात आले होते. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. यावर  सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सध्या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहे. 

Web Title: Ajit Pawar NCP President! Resolution approved with 40 mla sign; A big revelation from Election Commission documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.