राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी अजित पवार नॉट रिचेबल; शरद पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 07:09 PM2019-09-27T19:09:44+5:302019-09-27T19:10:58+5:30

राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अजित पवारांचेही नाव आहे.

Ajit Pawar not rechable for NCP leaders; The reason for the resignation is in suspence | राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी अजित पवार नॉट रिचेबल; शरद पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी अजित पवार नॉट रिचेबल; शरद पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Next

मुंबई : ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी खेळलेली ईडी कार्यालयाला भेट देण्याची खेळी संपत नाही तोच राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या या पावलाबाबत राष्ट्रवादीचे पदाधिकारीही अनभिज्ञ आहेत. 


राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अजित पवारांचेही नाव आहे. आजच्या ईडी नाट्यानंतर अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर अजित पवारांचा मोबाईलही नेत्यांसाठी नॉट रिचेबल झाला आहे. 


राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे हे सध्या शरद पवारांसोबत आहेत. शरद पवार ईडीच्या कार्यालयाला भेट देण्याचे रद्द झाल्यानंतर पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी मुंबईतून रवाना झाले. मात्र, अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत काकडेंनाही माहिती नव्हते. काकडेंनी अजित पवारांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवारांचा फोन नॉट रिचेबल लागत होता. म्हणून त्यांनी अजित पवारांच्या पीएला फोन केला. मात्र, पीएलाही पवारांचा फोन लागत नव्हता. 


शरद पवारांची सायंकाळी 8 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्येच राजीनामा नाट्याबाबत खुलासा होण्याची शक्यता असल्याचे समजते. 

बागडेंनी काय सांगितले? 

अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी फोन केला होता. आज सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. फोनवर हरीभाऊ बागडेंनी अजित पवारांना राजीनाम्याचे कारण विचारले होते. मात्र, त्यांनी आधी राजीनामा स्वीकारा नंतर कारण सांगतो असे म्हटले होते. 

Web Title: Ajit Pawar not rechable for NCP leaders; The reason for the resignation is in suspence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.