शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
ऑटोमॅटीक कार चालवत असाल तर लक्ष द्या; रक्ताच्या गुठळ्या, कार्डियाक अरेस्टचा धोका
4
"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
5
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
6
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
7
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
8
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
9
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
10
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
11
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स
12
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
13
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
14
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
15
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
16
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
17
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
18
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
19
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
20
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी

पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 16:38 IST

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. सरकार स्थापन होताच योजनेतील पैसे 1500 वरुन 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. अद्याप पैसे वाढवण्याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. विधानसभेच्या अधिवेशनात सरकारने योजनेतील रक्कम वाढवणार असल्याचे म्हटले आहे, पण कधी वाढवणार? हे मात्र स्पष्ट सांगितले नाही. यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. अशातच, आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले अजित पवारनांदेड मधील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, शासनाच्या तिजोरीत पैसे नसल्याचे विरोधक बोलत आहेत, पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा 7 लाख 20 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी योग्य त्या ररतुदी केल्या आहेत. माझ्या लाडक्या बहिणींसाठीही निधी उपलब्ध आहे. विरोधक, ही योजना बंद करतील असे म्हणत होते. अनेक महिला भेटल्या. त्यांनीही मला विनवले की, 1500 रुपये देता 2100 रुपये द्या. मी त्यांना नाही म्हटले नाही. 

पैशाचे सोंग करता येत नाही...ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल, त्यावेळी तुम्हाला 2100 रुपये देणार.मी सगळा राज्याचा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता, तसा मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचे, कामगारांना काय द्यायचे, मागासवर्गीयांना, अल्पसंख्यांकांना काय द्यायचे, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. सगळी सोंग करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाहीत. सरकारला ही योजना चालू ठेवायची आहे, त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत, अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस