शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

शिंदे, फडणवीसांसोबत पत्रकार परिषदेत बसताच अजितदादा म्हणाले- "मी ग्वाही देतो की.."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 8:18 PM

अजित पवार यांचे शिंदे-फडणवीसांच्या सत्तेतील पहिलेच अधिवेशन

Ajit Pawar, Maharashtra Monsoon Session: महाराष्ट्रात २ जुलैला मोठा राजकीय भूकंप झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार असे हे सरकार यंदाच्या पावसाळी अधिवेशनाला विरोधकांना सामील जाणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार टाकला. मात्र, आम्ही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ असे अजित पवार म्हणाले. शिंदे आणि फडणवीस यांच्यासह पहिल्यांदाच अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत बसताच अजित दादांनी एक ग्वाहीदेखील दिली.

"सभागृहात सत्ताधारी पक्षाची उपस्थिती ठेवणे हे आमचे उद्देश्य असेल. जेणेकरून प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सारेच लोक तयार असतील. विरोधकांकडून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आयुधांचा वापर करुन योग्य पद्धतीने काम केले जाईल याची आम्ही दखल घेऊ. लोकशाही आम्हाला माहिती आहे. आमच्यातील बरेच लोक हे अनुभवी आहेत. त्यामुळे सगळे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यंदाचे पावसाचं प्रमाण म्हणावं तसं दिसत नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने पाऊस पडला तर बळीराजा नक्कीच समाधानी राहिल. पण एक गोष्ट मात्र नक्की, मी तुम्हाला ग्वाही देतो की, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना थातूरमातूर उत्तर देऊन बोळवण करण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून होणार नाही. आम्ही विरोधकांना व्यवस्थितपणे उत्तर देण्याचं काम करु", असे अजित पवार यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

"उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आम्ही जनतेच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा करु. लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करु. विरोधी पक्ष हा विरोध करण्याच्या मानसिकतेतून अद्याप निघालेला नाही. एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीच्या मंदिराने दिलेल्या निर्णयाला मानायचं नाही हा प्रकार योग्य नाही. हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आहे त्यामुळे सरकारला बेकायदेशीर म्हणणे चुकीचे आहे. तसेच विरोधकांच्या पत्रात काही मुद्दाच नव्हता त्यामुळे त्यांनी पत्र देण्याऐवजी ग्रंथच लिहीला", असे फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"राज्यात पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही. पाऊस न आल्याने आम्हाला देखील चिंता आहे. शेवटी निसर्ग आहे लहरीप्रमाणे अतिवृष्ठी गारपीट होत आहे. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधी पक्ष गोंधळलेला असून त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. तसेच विरोधी पक्ष कुठे आहे हे देखील शोधले पाहिजे. आम्ही तिघांनीही विरोधी पक्षनेते पद सांभाळले आहे. त्यामुळे विरोधकांनी देखील त्यांचं काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. विरोधकांना चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. फडणवीस बॅटिंग, बॉलिंग करतात चौकार आणि षटकार मारतात. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी राज्याबद्दल प्रेम दाखवल्यामुळे राज्याबाहेर गेलेले अनेक प्रकल्प आले", असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे