Ajit Pawar: “भाजपसोबत जाणार का?”; अंजली दमानिया यांच्या ट्विटवर अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:31 PM2023-04-12T15:31:57+5:302023-04-12T15:32:51+5:30
Ajit Pawar: अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
Ajit Pawar: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली. १५-१६ आमदार अपात्र ठरणार आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार आहेत, तेही लवकरच असा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा त्यांन एका वाक्यात उत्तर दिले.
मी मंत्रालयात गेले होते तेव्हा तिथे एक चांगले पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. ते भेटले होते. त्यांनी तुम्हाला काही सांगायचे असे असे म्हटले होते. यावेळी त्यांनी अजित पवार हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत बिलकुल दिसत नाहीएत. त्यांची आणि भाजपाची नक्कीच जवळीक दिसतेय. हे १५-१६ आमदार बाद होणार आहेत, अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत, असे सांगितले. मी त्यांना तेव्हा मग काय करायचे, असे विचारले आणि पुढच्या कामाला निघून गेले, असे दमानियांनी सांगितले, असा खुलासा अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटसंदर्भात केला. यानंतर मीडियाशी बोलताना अजित पवार यांना याप्रकरणी विचारणा करण्यात आली.
“भाजपसोबत जाणार का?”; अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर
भाजपबरोबर जाणार या अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवार म्हणाले की, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे. तर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नाव नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले की, मला आणि सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाही. ती चौकशी सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही. ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला कळायला मार्ग नाही, पण मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
अंजली दमानिया यांनी नेमके काय ट्विट केले होते?
मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत.... तेही लवकरच बघू..... आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"