Ajit Pawar: "या एका गोष्टीचा मला खेद, दुःख..."; अजित पवारांचा प्रेस कॉन्फरन्समधून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 08:07 PM2023-03-25T20:07:42+5:302023-03-25T20:11:04+5:30

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर अजित पवार साधला पत्रकांराशी संवाद

Ajit Pawar says I have some sorrows related to Maharashtra Government of Eknath Shinde Devendra Fadnavis | Ajit Pawar: "या एका गोष्टीचा मला खेद, दुःख..."; अजित पवारांचा प्रेस कॉन्फरन्समधून हल्लाबोल

Ajit Pawar: "या एका गोष्टीचा मला खेद, दुःख..."; अजित पवारांचा प्रेस कॉन्फरन्समधून हल्लाबोल

googlenewsNext

Ajit Pawar vs Shinde Fadnavis Govt: "माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन असेल ज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ, अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारुन घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. विधीमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, बेफीकिरी जाणवली, या एका गोष्टीचा मला खेद आणि दुःख आहे", अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकांराशी संवाद साधला. अनेक विषयांवरुन अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

"तुम्हाला राज्यात सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम करायचे नाही. हे कसं चालेल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायचा तेव्हा येईल. जो यायचा तो येईल, परंतु जोपर्यंत सत्तेत आहात, तोपर्यंत तरी काम केले पाहिजे. संसदीय लोकशाहीसाठी अनेक धोकादायक गोष्टी घडत आहेत. विधीमंडळ कामकाजाबद्दल सरकारची अनास्था हा सुद्धा गंभीर धोका आहे. विधीमंडळात आमदारांकडून जनतेचे प्रश्न मांडले जातात, परंतु सरकार याकडे गांभीर्याने बघणार नसेल, तर जनताच यांना गांभीर्याने घेईल. अधिवेशनकाळात विरोधी पक्षनेता या नात्याने, सकाळी कामकाज सुरु झाल्यापासून, रात्री कामकाज संपेपर्यंत, एखादा अपवाद वगळता, मी कायम सभागृहात उपस्थित राहिलो. विरोधी पक्षाच्या आमदारांनीही पूर्णवेळ उपस्थिती लावली.विधीमंडळाचे अधिवेशन हे राज्यातील जनतेचे प्रश्न मांडण्याचे आणि सोडवण्याचे व्यासपीठ असल्याने, सभागृहाचे कामकाज बंद पडू नये, ते पूर्ण वेळ चालावे, यासाठी सरकारपेक्षा, आमची विरोधी पक्षांचीच आग्रही भूमिका आणि प्रयत्न राहिला," असे अजित पवार म्हणाले.

"संपूर्ण अधिवेशन काळात, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकांचे प्रश्न मांडण्याचा, त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सभागृहात आणि सभागृहाबाहेर विधानमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. अलिकडे, सत्तारुढ पक्षानेच सभागृहात गोंधळ घालण्याचा, विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा, नवा पायंडा सुरु केलाय. सत्तारुढ पक्षाने, सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात, सत्ता पण उपभोगायची आणि आंदोलनही करायचे, हे लोकशाहीसाठी योग्य नाही," अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.

Web Title: Ajit Pawar says I have some sorrows related to Maharashtra Government of Eknath Shinde Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.