"कुणाचे कुणावाचून अडत नाही", कुंपणावर बसलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 07:56 PM2024-07-21T19:56:50+5:302024-07-21T19:57:19+5:30

Ajit Pawar News: कुणाचे कुणावाचून अडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे काही करू नका. आपल्याच पक्षात राहा, असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

Ajit Pawar scolded the leaders who were sitting on the fence, "Nobody's property is obstructed by anyone". | "कुणाचे कुणावाचून अडत नाही", कुंपणावर बसलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ठणकावले

"कुणाचे कुणावाचून अडत नाही", कुंपणावर बसलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ठणकावले

पिंपरी - ज्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट नसेल, त्यांना समजावून सांगा. कोण येऊन काही सांगत असेल तर त्यांना शहराबद्दल फार काही जिव्हाळा आहे असे नाही. अजित पवार म्हणजे पिंपरी-चिंचवड आहे. कुणाचे कुणावाचून अडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे काही करू नका. आपल्याच पक्षात राहा, असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी (दि. २१) मेळावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, योगेश बहल, राजू मिसाळ, जगदीश शेट्टी, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अपर्णा डोके, शमीम पठाण, वसंत लोंढे, पंडित गवळी, श्याम लांडे, सतीश दरेकर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष जगताप उपस्थित होते. 

शरद पवारांचा अनादर केला नाही : अजित पवार
पुण्यामध्ये डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकले याचे रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण ‘मी साहेबांना बोलू दिले नाही’ असे म्हणतात. अरे, मी कसा बोलू देणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली. काय घडले, काय नाही या खोलात जात नाही, आम्ही अनादर करणारे लोक नाहीत, असेही पवार म्हणाले.

लोकसभेत चुकीच्या प्रचारामुळे नुकसान : पवार
अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्या तत्त्वाने काम करणारे महायुतीचे सरकार आहे. मात्र, लोकसभा प्रचारात विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला नागरिक बळी पडले आणि त्याचा फटका आम्हाला बसला.

अण्णा बनसोडे यांना मंत्री करा : विलास लांडे
अजित पवार यांनी शहरातील माझ्यासह अनेकांना पद देऊन मोठे केले. मात्र, दादा तुमच्या पुढे पुढे करणारे मोठे होऊन तुम्हाला सोडून जातात. याची मला खंत आहे, असे म्हणत अजित गव्हाणे यांच्यावर माजी आमदार विलास लांडे यांनी टीका केली. दरम्यान, विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाने मी शरद पवार गटात गेल्याचा दावा गव्हाणेंनी केला होता. मात्र, आता विलास लांडे यांनी गव्हाणेंना लक्ष केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार गुलाबी स्वप्ने सत्यात उतरवतात
रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवार गुलाबी स्वप्न दाखवतात, अशी टीका काही खासदार करीत आहेत. मात्र, त्यांना एकच सांगायचे आहे, दादा फक्त गुलाबी स्वप्न दाखवत नाहीत, तर ते पूर्ण करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे समस्या सोडविण्यासाठी जनतेची रांग लागलेली असते.

Web Title: Ajit Pawar scolded the leaders who were sitting on the fence, "Nobody's property is obstructed by anyone".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.