शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

"कुणाचे कुणावाचून अडत नाही", कुंपणावर बसलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 7:56 PM

Ajit Pawar News: कुणाचे कुणावाचून अडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे काही करू नका. आपल्याच पक्षात राहा, असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

पिंपरी - ज्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट नसेल, त्यांना समजावून सांगा. कोण येऊन काही सांगत असेल तर त्यांना शहराबद्दल फार काही जिव्हाळा आहे असे नाही. अजित पवार म्हणजे पिंपरी-चिंचवड आहे. कुणाचे कुणावाचून अडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे काही करू नका. आपल्याच पक्षात राहा, असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी (दि. २१) मेळावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, योगेश बहल, राजू मिसाळ, जगदीश शेट्टी, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अपर्णा डोके, शमीम पठाण, वसंत लोंढे, पंडित गवळी, श्याम लांडे, सतीश दरेकर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष जगताप उपस्थित होते. 

शरद पवारांचा अनादर केला नाही : अजित पवारपुण्यामध्ये डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकले याचे रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण ‘मी साहेबांना बोलू दिले नाही’ असे म्हणतात. अरे, मी कसा बोलू देणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली. काय घडले, काय नाही या खोलात जात नाही, आम्ही अनादर करणारे लोक नाहीत, असेही पवार म्हणाले.

लोकसभेत चुकीच्या प्रचारामुळे नुकसान : पवारअजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्या तत्त्वाने काम करणारे महायुतीचे सरकार आहे. मात्र, लोकसभा प्रचारात विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला नागरिक बळी पडले आणि त्याचा फटका आम्हाला बसला.

अण्णा बनसोडे यांना मंत्री करा : विलास लांडेअजित पवार यांनी शहरातील माझ्यासह अनेकांना पद देऊन मोठे केले. मात्र, दादा तुमच्या पुढे पुढे करणारे मोठे होऊन तुम्हाला सोडून जातात. याची मला खंत आहे, असे म्हणत अजित गव्हाणे यांच्यावर माजी आमदार विलास लांडे यांनी टीका केली. दरम्यान, विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाने मी शरद पवार गटात गेल्याचा दावा गव्हाणेंनी केला होता. मात्र, आता विलास लांडे यांनी गव्हाणेंना लक्ष केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार गुलाबी स्वप्ने सत्यात उतरवतातरुपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवार गुलाबी स्वप्न दाखवतात, अशी टीका काही खासदार करीत आहेत. मात्र, त्यांना एकच सांगायचे आहे, दादा फक्त गुलाबी स्वप्न दाखवत नाहीत, तर ते पूर्ण करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे समस्या सोडविण्यासाठी जनतेची रांग लागलेली असते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड