मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी आघाडी करण्याची वेळ आलीच तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून सामावून घेणे आम्हाला शक्य होणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे बजावले.‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील हे उपमुख्यमंत्री असताना सरकारची प्रतिमा चांगली होती. नंतर ती तशी राहिली नाही. आता आघाडी करावी लागल्यास आमच्या दृष्टीने सरकारची प्रतिमा हा महत्त्वाचा विषय असेल. त्यात अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत. मुख्यमंत्रिपद अर्थात काँग्रेसकडेच असेल. गृह व वित्त ही महत्त्वाची खाती काँग्रेसकडेच असावीत, ही आणखी एक मुख्य अट असेल, असे चव्हाण म्हणाले. देशात आघाडीच्या सरकारांमध्ये कुठल्याही राज्यात असेच आहे. महाराष्ट्रातही तेच असले पाहिजे. (प्रतिनिधी)
अजित पवार आता नकोत
By admin | Published: October 06, 2014 5:38 AM