Ajit Pawar Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील पोलिसांनाच आता संरक्षण देण्याची वेळ आलीय; अजित पवारांनी गृहमंत्री फडणवीसांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 04:12 PM2023-03-15T16:12:21+5:302023-03-15T16:14:13+5:30

गेल्या तीन महिन्यात पोलिसांवर ३० हून अधिक हल्ल्याच्या घटना

Ajit Pawar slams Home Minister Devendra Fadnavis saying Now is the time to protect Maharashtra police as people attack them | Ajit Pawar Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील पोलिसांनाच आता संरक्षण देण्याची वेळ आलीय; अजित पवारांनी गृहमंत्री फडणवीसांना सुनावलं

Ajit Pawar Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील पोलिसांनाच आता संरक्षण देण्याची वेळ आलीय; अजित पवारांनी गृहमंत्री फडणवीसांना सुनावलं

googlenewsNext

Ajit Pawar Devendra Fadnavis: राज्यात सध्या भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. कोणत्याही राज्यातील पोलीस हे सदैव जनतेच्या रक्षणासाठी तत्पर असतात. पण सध्या महाराष्ट्रात अशी विचित्र परिस्थिती ओढवली आहे की पोलिसांवर काही लोकांकडून हल्ले केले जात आहेत. या घटना वाढत गेल्या तर अनर्थ होईल. त्यामुळे आता महाराष्ट्रात पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले.

"राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसवावी," अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

"राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. अंगावर थेट गाडी चढवणे, गाडीसोबत फरफटत नेणे, लोकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनात वाढ झालेली आहे. एकंदरीतच राज्यात पोलिसांवर वेगवेगळया ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना वाढत असून नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटारसायकल इत्यादी गोष्टी पुरविण्याची आवश्यकता आहे. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती वाढू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यावर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी आणि पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि असे हल्ले होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करा," असे अजित पवार यांनी सुचवले.

Web Title: Ajit Pawar slams Home Minister Devendra Fadnavis saying Now is the time to protect Maharashtra police as people attack them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.