Devendra Fadnavis: 'हे' तर अजित पवारांविरोधातच षडयंत्र; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:48 PM2022-06-16T16:48:26+5:302022-06-16T16:57:35+5:30

अजित पवार आणि मोदी मनमोकळेपणाने बोलत होते. हे कदाचित काहींना आवडलं नाही असं फडणवीस यांनी सांगितले.

Ajit Pawar Speech Controversy: is a conspiracy against Ajit Pawar; Devendra Fadnavis's sensational claim | Devendra Fadnavis: 'हे' तर अजित पवारांविरोधातच षडयंत्र; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

Devendra Fadnavis: 'हे' तर अजित पवारांविरोधातच षडयंत्र; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

googlenewsNext

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्यानं राज्यात वाद निर्माण झाला. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावरून ठिकठिकाणी आंदोलन केले. भाजपाने अजितदादांना भाषण करू न दिल्याने महाराष्ट्राचा अपमान केला अशी टीका राष्ट्रवादी नेत्यांकडून सातत्याने होऊ लागली. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे.

भाजपाच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अजितदादांची विचारपूस केली. जेव्हा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं(Narendra Modi) नाव भाषणासाठी आले तेव्हा मोदींनी स्वत: अजितदादा बोलणार नाहीत का असं विचारलं. अजितदादांनी तुम्हीच बोला असं म्हटलं. इतका कार्यक्रम चांगला झाल्यानंतर जाणीवपूर्णक या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. कदाचित अजित पवारांविरोधातच हे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. 

तसेच अजित पवार(Ajit Pawar) आणि मोदी मनमोकळेपणाने बोलत होते. हे काहींना आवडलं नाही. त्यामुळे ही अजितदादांविरोधात ही त्यांची खेळी असू शकते. राजकारणात प्रत्येक गोष्टीचे अंदाज लावता येतात. त्यात तथ्य शोधून काढायला हवा. मला जे वाटतं ते मी सांगितले त्यामुळे ते शोधून काढण्याचं काम तुमचं आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे सूचक वक्तव्य केले आहे. 

काँग्रेसचं आंदोलन चुकीचं 
खासदार राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणं चुकीचे आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा परवाना देशात कुणाला नाही. चौकशीवेळी तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचं काम काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून करतंय. एजीएलची संपत्ती गांधी कुटुंबाने लाटली असा आरोप त्यांच्यावर आहे असं फडणवीस यांनी म्हटलं. 

MIM ही शिवसेनेची बी टीम 
MIM ने शिवसेनेला मतदान करून उमेदवाराला निवडून आणलं आहे. MIM शिवसेनेची बी टीम आहे हे सिद्ध झाले आहे. ए टीमला मदत होणारी वक्तव्य जलील करत आहेत. भाजपा कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. भाजपा पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी जलील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Web Title: Ajit Pawar Speech Controversy: is a conspiracy against Ajit Pawar; Devendra Fadnavis's sensational claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.