"अमित शाह दारात तरी उभं करतील का?"; ३०० कोटींचा उल्लेख करत अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:20 PM2024-10-25T16:20:50+5:302024-10-25T16:33:27+5:30

आमच्या खानदानाला घरी नेलं, ओवाळलं आणि आता अदृश्य प्रचार केला, असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली.

Ajit Pawar strongly criticized Harshvardhan Patal from Indapur Assembly Constituency | "अमित शाह दारात तरी उभं करतील का?"; ३०० कोटींचा उल्लेख करत अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा

"अमित शाह दारात तरी उभं करतील का?"; ३०० कोटींचा उल्लेख करत अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा

Indapur Assembly Constituency : इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दत्ता भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर सडकून टीका केली. हर्षवर्धन पाटलांनी सागर कारखाना अडचणीत आणला म्हणत अशा दलबदलू लोकांवर कोण विश्वास ठेवणार आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा अदृश्य प्रचार केल्याच्या वक्तव्यावरूनही अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना सुनावलं आहे.

 इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना आल्यानंतर अजित पवारांनी थेट हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेत असताना तुम्ही फक्त इंदापूर सांभाळू शकला नाहीत. कर्मयोगी कारखान्याचे वाटोळे केले आहे, असे म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर निशाणा साधला. तसेच हर्षवर्धन पाटील विधानपरिषदेवर न घेतल्याने भाजप सोडून शरद पवारांच्या पक्षात गेल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं. अमित शहा यांच्याकडे मी गेल्यावर काम होईल, का हा बाबा गेल्यावर काम होईल? अमित शाह याला दारात तरी उभं करतील का? असाही सवाल अजित पवारांनी केला.

"हर्षवर्धन पाटलांनी राज्य सरकारच्या मागे लागून ३०० कोटी रुपये आणले त्याचे काय केले. सगळं गोड गोड बोलून आमच्याकडून अमित शहांकडून मंजूर करून घेतलं आणि सोयीचे आले की गेले निघून. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा आमचा खानदानाला घरी नेल्यावर जेवायला घातला आणि अदृश्य प्रचार केला. ही लोक कोणाचीच नाही. अजित पवारने असं आयुष्यात कधी केलं नाही. जो कोणी उभा राहील त्याचा एक इमाने ईदबारी प्रचार केला," असं अजित पवार म्हणाले.

"देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील आणि मी सागर बंगल्यावर बसलो होतो. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आता तुम्ही सगळ्यांनी काम करा आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. तेव्हा हर्षवर्धन पाटील म्हणाले आमदारकीचं काय. मी म्हटलं आमदारकीच्या संदर्भात मी काय निर्णय घेणार नाही. त्यानंतर ते म्हटले देवेंद्र फडणवीस जे म्हणतील ते मान्य असेल. त्यानंतर मी हो म्हटलं हर्षवर्धन पाटील सुद्धा हो म्हणाले. निवडणुका जवळ आल्यावर त्यामध्ये विधानपरिषदेच्या १२ जागा भरायच्या होत्या. त्यातील सात जागा आता भरल्या पाच जागा राहिल्या. मला स्वतः भाजपाचा काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेणार आहोत. परंतु त्यांची थांबायची तयारी नव्हती. सारखं आपण कसं आपण थांबून कसं चालेल. त्यानंतर भाजप पण सोडून दिला आणि आता शरद पवारांच्या पक्षात गेले. सारखं दलबदलूपणा तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल," अशा शब्दात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर निशाणा साधला.

 

Web Title: Ajit Pawar strongly criticized Harshvardhan Patal from Indapur Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.