ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार व सुनील तटकरे यांच्या अडचणीत भर पडली असून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) समन्स बजावले आहे. तटकरे यांनी १५ तर अजित पवार यांनी १६ सप्टेंबररोजी चौकशसाठी हजर व्हावे असे या समन्समध्ये म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराप्रकरणी छगन भुजबळ यांच्याविरोधात कायद्याचा फास आवळल्यानंतर आता एसीबीने सिंचन घोटाळ्याचा तपास वेगाने सुरु केला आहे. बाळगंगा धरणातील भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला असून अजित पवार व सुनील तटकरे यांच्या अडचणीतही भर पडताना दिसत आहे. एसीबीने पुन्हा एकदा या दोघांना समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मे महिन्यातही एसीबीने राष्ट्रवादीच्या या दोघा नेत्यांना समन्स बजावले होते. मात्र त्यावेळी दोघांनी त्यांचे म्हणणे लेखी मांडले होते.