Ajit Pawar, Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आले, बाईट देऊ लागले अन् तेवढ्यात अजितदादांनी डोळा मारला... (Video Viral)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:23 PM2023-03-09T20:23:08+5:302023-03-09T20:25:23+5:30

उद्धव ठाकरे बोलू लागताच अजितदादांनी 'त्या' व्यक्तीकडे नजर फिरवली अन्...

Ajit Pawar trolled Uddhav Thackeray or not when he was giving reactions on Maharashtra Budget by Devendra Fadnavis watch video viral | Ajit Pawar, Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आले, बाईट देऊ लागले अन् तेवढ्यात अजितदादांनी डोळा मारला... (Video Viral)

Ajit Pawar, Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आले, बाईट देऊ लागले अन् तेवढ्यात अजितदादांनी डोळा मारला... (Video Viral)

googlenewsNext

Ajit Pawar troll, Uddhav Thackeray, Maharashtra Budget: मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. शेती-शेतकरी, महिला व अल्पसंख्याक विकास, भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचा विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास अशा ५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेकविध घोषणा करण्यात आल्या. तसेच काही नव्या योजनांचाही समावेश करण्यात आला. यावर महाविकास आघाडीतील शिवसेनेा उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. मात्र उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देण्यासाठी आले, त्यावेळी अजित पवारांनी जे केलं त्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजित पवार हे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत होते. अजितदादांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि अर्थसंकल्पाचा खरपूस समाचार घेतला. ते जेव्हा प्रतिक्रिया देत होते त्यावेळी उद्धव ठाकरे येत असल्याचे त्यांना समजले. तसे समजताच अजितदादांनी त्यांची प्रतिक्रिया आवरती घेतली आणि उद्धव ठाकरेंना जागा करून दिली. अजितदादांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे दोघांनाही पाहिल्यानंतर ते बाजूला होत होते. पण तसे होत असतानाच, उद्धव ठाकरेंनी अजितदादांना तिथेच थांबण्याची विनंती केली. हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा अजितदादा तिथेच उभे होते. ते तिथेच थांबले आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देण्यात सुरूवात केली. नेमके त्याच वेळी अजितदादांनी उद्धव ठाकरे ज्या दिशेला उभे होते त्यांच्या विरूद्ध दिशेला पाहून कोणाच्या तरी दिशेने हळूच डोळा मारला. त्यांच्या डोळा मारण्याचा अर्थ काय अन् त्यामागचा हेतू काय हे कळू शकले नाही. तसेच त्यांना कोणाकडे पाहून डोळा मारला हेदेखील समजले नाही. पण त्या घटनेचा व्हिडीओ मात्र भलताच व्हायरल झाला. पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मात्र प्रतिक्रिया देताना अर्थसंकल्पाचा चांगलाच समाचार घेतला. "महाविकास आघाडीने आपल्या अर्थसंकल्पात जे मुद्दे मांडले होते, त्याच मुद्द्यांवर आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. आम्ही सत्तेत असताना केंद्रातील सरकार आमच्या बाजूचे नव्हते त्यामुळे केंद्राकडून येणारा GST ता निधी कायम थकबाकीत असायचा. नेहमी सरासरी २५ हजार कोटींच्यापेक्षा जास्तीची थकबाकी शिल्लक असायची. आता सरकारला सहा महिने झालेत. महाशक्तीचा पाठिंबा असलेले हे सरकार कसा कारभार करत आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर एकही माणूस पंचानामे करायला गेला नाही. अजूनही काही गोष्टी मला समजल्या आहेत. अवकाळी पावसाप्रमाणाचे आज मुंबईत गडगडाट झाला. पण गरजेल तो बरसेल का असा सध्याचा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे हा 'गाजर हलवा' अर्थसंकल्प आहे", अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर मत व्यक्त करत सरकारची खिल्ली उडवली.

Web Title: Ajit Pawar trolled Uddhav Thackeray or not when he was giving reactions on Maharashtra Budget by Devendra Fadnavis watch video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.