अजित पवारांची आता विखेंवर कुरघोडी? मेंढपाळप्रश्नी बैठक घेऊन दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:51 AM2023-08-22T11:51:42+5:302023-08-22T11:51:59+5:30

अजित पवार आणि विखे-पाटील यांचे जुने राजकीय वैमनस्य आहे

Ajit Pawar trying to overpower Radhakrishna Vikhe Patil in Maharashtra Politics | अजित पवारांची आता विखेंवर कुरघोडी? मेंढपाळप्रश्नी बैठक घेऊन दिले निर्देश

अजित पवारांची आता विखेंवर कुरघोडी? मेंढपाळप्रश्नी बैठक घेऊन दिले निर्देश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुख्यमंत्र्यांकडील विषयांसदर्भात बैठक घेतल्याने उठलेले वादळ शांत होते ना होते, तोपर्यंत अजित पवार यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे असलेल्या विषयासंदर्भात बैठक घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राधाकृष्ण विखे-पाटील राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री आहेत. राज्यातील धनगर, मेंढपाळ समाजाचा विषय त्यांच्या खात्यांतर्गत येतो. अजित पवार यांनी सोमवारी राज्यातील धनगर, मेंढपाळ समाजाच्या समस्या सोडवणे तसेच विकास योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक घेतली.

या बैठकीला दुग्धविकास व पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुंबईत असूनही या बैठकीकडे फिरकले नाहीत. अजित पवार आणि विखे-पाटील यांचे जुने राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून पवार यांनी विखे-पाटील यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

उत्पन्नाच्या शाश्वत स्रोतासाठी...

मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना अजित पवार यांनी या बैठकीत दिले.

Web Title: Ajit Pawar trying to overpower Radhakrishna Vikhe Patil in Maharashtra Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.