अजित पवारांना सत्तेचा मार्ग शरद पवारांनीच दाखवला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 05:23 PM2023-07-07T17:23:00+5:302023-07-07T17:23:27+5:30

विरोधी पक्ष आम्हाला चांगले कसे बोलेल. ते छोट्या मनाचे आहेत. आमची विकासकामे पाहून ते घाबरलेत असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला.

Ajit Pawar was shown the path to power by Sharad Pawar; Chief Minister Eknath Shinde's statement | अजित पवारांना सत्तेचा मार्ग शरद पवारांनीच दाखवला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान

अजित पवारांना सत्तेचा मार्ग शरद पवारांनीच दाखवला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान

googlenewsNext

मुंबई – भाजपासोबत राष्ट्रवादीने जायचे हे आधी शरद पवारांच्या मर्जीने झाले असेल परंतु आता पवारांना ही बाब माहिती नसावी. सत्तेचा मार्ग शरद पवारांनीच दाखवला होता. त्यांनी पलटी मारली म्हणून अजित पवार आणि इतर नेत्यांनी करेक्ट कार्यक्रम केला असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याचसोबत मुख्यमंत्रिपदाबाबत मला चिंता नाही. वरती बसलेले योग्य निर्णय घेतात. विरोधी पक्षाकडे काहीच काम नसल्याने ते अफवा पसरवतात असं शिंदेंनी म्हटलं.

एकनाथ शिंदे म्हणाले की,  राष्ट्रवादी फुटली, जे शरद पवारांनी पूर्वी केले तेच आता झाले. काम करणाऱ्या नेत्याला बाजूला केले तर असे अपघात होतात. २०१७, २०१९ मध्ये स्वत: शरद पवारांनीच भाजपासोबत जाण्याचं ठरवले असं अजित पवारांनी सांगितले. शरद पवारांनी वारंवार अपमानित केले. यू-टर्न घेतला. मग नेते करणार काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच आम्ही खुर्चीच्या लालसेपोटी भाजपा-शिवसेना सरकार बनवले नाही. आम्ही विचारधारा पुढे नेण्यासाठी हे सरकार बनवले. आमच्या आमदारांना अडीच वर्षात वाईट वागणूक दिली. गेल्या वर्षभरात आम्ही आमदारांच्या मतदारसंघात निधी देण्याचे काम केले. तिसरा पार्टनर आल्याने वाटून निधी घेऊ. आम्ही आमदारांच्या शंका दूर केल्यात २०२४ मध्ये आम्हाला निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, विरोधी पक्ष आम्हाला चांगले कसे बोलेल. ते छोट्या मनाचे आहेत. आमची विकासकामे पाहून ते घाबरलेत. जे प्रकल्प बंद पडावेत असे वाटत होते ते आम्ही करतोय. त्यामुळे आम्हाला शिवीगाळ केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काही नाही. जनतेला सगळे माहिती आहे. आम्ही कामावर लक्ष देतो. विरोधकांच्या टीकेवर लक्ष देत नाही. महाराष्ट्रात आता ट्रीपल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणारा निधीचा ओघ सुरु झाला आहे. प्रकल्पांमध्ये कुठल्याही प्रकारची कपात न करता, भरीव निधी मिळतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे राज्याच्या विकासाला पाठबळ लाभत आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title: Ajit Pawar was shown the path to power by Sharad Pawar; Chief Minister Eknath Shinde's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.