सरकार असो वा नसो...अजित पवारांचा दबदबा कायम राहणार; विरोधी पक्षनेतेपद मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:04 AM2022-06-30T11:04:54+5:302022-06-30T11:07:07+5:30

Ajit Pawar Leader Of Opposition: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.

Ajit Pawar will get Leader Of Opposition in maharashtra vidhan sabha | सरकार असो वा नसो...अजित पवारांचा दबदबा कायम राहणार; विरोधी पक्षनेतेपद मिळणार?

सरकार असो वा नसो...अजित पवारांचा दबदबा कायम राहणार; विरोधी पक्षनेतेपद मिळणार?

googlenewsNext

Ajit Pawar Leader Of Opposition: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ३९ आमदारांना सोबत घेऊन ऐतिहासिक बंड केल्यामुळे ठाकरे सरकार कोसळण्याची नामुष्की ओढावली. आता राज्यात भाजपाशासित सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यात राज्याचं नेतृत्व पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं जाईल. याची फक्त औपचारिकता आता बाकी आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं विरोधात बसण्याची तयारी देखील केली आहे. 

राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा

राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता खरंतर 'शॅडो मुख्यमंत्री' म्हणून ओळखला जातो. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधातील सर्वात मोठा पक्ष ठरतो. कारण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ५५ आमदार असले तरी बंडखोरीमुळे ३९ आमदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. शिंदे गटाकडून त्यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतं आणि अजित पवार या भूमिकेत दिसू शकतात. 

काय भाषण... केवढा संयम... काय जिगर...; उद्धव ठाकरेंनी जाता जाता मनं जिंकली!

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांचा दबदबा होता. उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अशी दोन्ही महत्वाची पदं अजित पवार यांच्याकडे होती. अजित पवारांचा हाच दबदबा कायम ठेवत ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेत पाहायला मिळू शकतील. 

Read in English

Web Title: Ajit Pawar will get Leader Of Opposition in maharashtra vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.