शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

'तुम्ही आम्हाला ८ जागा दिल्यात, आता उपमुख्यमंत्री असेपर्यंत काहीही कमी पडू देणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 3:06 PM

रोहित पवार यांना तुम्ही निवडून दिले आहे. तुमचं काम झालं, आता आमची जबाबदारी आहे.

मुंबई - नगर जिल्ह्याने बारा पैकी 9 जागा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाला निवडून दिल्या. यामध्ये प्राजक्त तनपुरे आणि शंकरराव गडाख मंत्री झालेत. याच जिल्ह्यातून रोहित पवारांना कर्जत जामखेडच्या मतदारांनी विजयी केले. पण याच नगर जिल्ह्यातून अनेकजन उमेदवारी घेण्यास मागे सरकत होते. आमचा मुलगा रोहित पवार यांच्यासारखे धाडसाने निवडणुकीत उभारायच असतं, असं अजित पवार यांनी म्हटले. 

रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून माजीमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित यांच्या विजयानंतर अजित पवार प्रथमच कर्जत-जामखेड मंतदार संघात आले होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या काळातील उमेदवारी निश्चित करतानाच्या आठवणी सांगितल्या. महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

रोहित पवार यांना तुम्ही निवडून दिले आहे. तुमचं काम झालं, आता आमची जबाबदारी आहे. नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही 8 जागांवर निवडून दिले. तसेच आम्ही पाठिंबा दर्शविलेले शंकरराव गडाख यांनाही तुम्ही विजयी केले. त्यामुळे उपमुख्यमंत्री असेपर्यंत नगर जिल्ह्याला काहीही कमी पडू देणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी दिला. 

श्रीगोंदा येथून घनश्याम  शेलार यांची उमेदवारी उशिरा जाहीर केली. ते एक महिनाआगोदर कामाला लागले असते तर तेही आमदार झाले असते. मात्र आमच्या राहुल जगताप यांच होय-नाही सुरू होतं. प्राजक्त तनपुरे देखील पण असच म्हणत होता, दादा उभं राहु का, की मागं राहू. अरे धाडसाने उभं राहायच असतं. आमचा मुलगा रोहित कसा पुणे जिल्ह्यातून आला आणि येथून विजयी झाला. हे धाडस खरं असल्याचं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेRam Shindeराम शिंदे