शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकांचे बंधू आनंदराव पाटील यांचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 8:40 PM

खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्र वादीचे नेते, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांचा खून केला.

सांगली : खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्र वादीचे नेते, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांचा खून केला. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खटाव-भिलवडी रस्त्यावर ही घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक गजानन पाटील यांचे ते बंधू होत.या रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून आनंदराव पाटील परतत असताना त्यांच्यावर सत्तुराने हल्ला करण्यात आला. पाटील यांच्या डोक्यावर, तसेच हातावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने व डोक्यातील वार वर्मी बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्ल्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले. त्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकही मागविण्यात आले होते. दरम्यान, पाटील यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर, राजकीय पदाधिका-यांसह गावक-यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी करण्यात आली, तसेच या खून प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार