"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढवणार", अजित पवार यांची मोठी घोषणा

By अजित घस्ते | Published: July 21, 2024 08:12 PM2024-07-21T20:12:27+5:302024-07-21T20:12:56+5:30

Ajit Pawar News: नुकतीच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी असलेले हे तीनही पक्ष एकत्र लढलो. मात्र “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

Ajit Pawar's big announcement, ``will contest the elections of local self-government bodies on our own'' | "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढवणार", अजित पवार यांची मोठी घोषणा

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढवणार", अजित पवार यांची मोठी घोषणा

- अजित गस्ते
पुणे - नुकतीच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीमधील सत्ताधारी असलेले हे तीनही पक्ष एकत्र लढलो. मात्र “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षात काम व्यवस्थित करा”, अशा सूचना देत “आपण लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक एकत्र लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत”, असा इशारा कार्यकर्तेना उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी दिला.

गुरु पौर्णिमा निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पुणे शहर विधानसभा अध्यक्ष , माजी नगरसेवक सर्व सेल कार्यकारणी पदाधिकारी मेळावा केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शनपर ते बोलत होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य तिथे स्वबळावर लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले.

मीडियाबाबत सावध रहा
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरीचे आमदार सूनील टिंगरे यांची तीन-चार वेळा चौकशी झाली. पण त्यातून काही समोर आलं नाही. त्यामुळे उगाच बदनामी केली जाते. लोकप्रतिनिधी म्हणून मदत करायला लोक फोन करतात तर जावं लागत. मीडियावर काही बदनामी केली जाते. पुण्याला बदनामी करणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या. त्या सर्वांवर कारवाई केली आहे. अतिक्रमण करून धंदे करणार असेल तर चालणार नाही. गैरप्रकार झाला तर कारवाई केली जाईल. नियमावलीत भेदभाव नाही. सर्वाना सारखाच न्याय देत आहोत. त्यामुळे बदनामी करून नये असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.

Web Title: Ajit Pawar's big announcement, ``will contest the elections of local self-government bodies on our own''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.