आजचा आमचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. आम्ही सोमवारी अमित शहांची भेट घेणार आहोत. आमचा दिल्लीचा दौरा सोमवारी किंवा मंगळवारी असेल. कांदा, इथेनॉल सह पाच सहा प्रश्नांवर शाहांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले.
मी विधानसभेत काय दिवे लावणारे एवढाच शब्द बोललो, सारखे उकरून काढू नका. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. PHD संदर्भातील वक्तव्याच्या वादाचा विषय माझ्यासाठी संपला आहे. बीडमधील जाळपोळीसंदर्भात चौकशी होत आहे. मास्टर माईंड कोण याचा शोध घेतला जात आहे, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार आहेत. महायुतीचे मिळावे, सभांच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे, सभा होणार आहेत. निधी सर्वांनाच देण्याचा प्रयत्न होतो. जागावाटपात काहीही वाद होणार नाही. समंजसपणे भूमिका घेणार. जागावाटपात कोणी धाकटा, मोठा असे नाही, सर्व व्यवस्थित करू, असा दावा पवारांनी केला आहे.
शरद पवार शाहंना भेटणार...शरद पवार हे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अमित शाहंची भेट घेण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांनी दिल्ली दौरा रद्द केल्याचे सांगितले जात आहे. राजेश टोपे देखील गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. लोकसभेतील सुरक्षा व्यवस्थेवरील गदारोळामुळे गुरुवारी शाहंसोबत ही बैठक होऊ शकली नाही. ती आज होणार आहे.