शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:05 AM

राष्ट्रवादीत दुफळी झाल्यानंतर पवार कुटुंबालाही त्याची झळ बसली.

पुणे - Yogendra Pawar Update ( Marathi News ) राजकारणात कधी कोण कुणाला शह-काटशह देईल सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ नंतर बरीच उलथापालथ झाली. त्यात राज्यातील २ प्रमुख पक्ष फुटले. इतकेच नाही तर पवार कुटुंबातही राजकीय फूट पडल्याचं दिसून आले. त्यातच आता अजित पवारांच्या पुतण्यानं शरद पवार गटात राजकीय एन्ट्रीचा चंग बांधल्याचे संकेत मिळत आहेत. 

अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांसोबत राहणार असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीत दुफळी झाल्यानंतर पवार कुटुंबालाही त्याची झळ बसली. अजित पवार, पार्थ पवार एका बाजूला गेले तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार शरद पवारांसोबत राहिले. त्यात आता अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार काकांना शह देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बारामतीतल्या शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार हे युवकांशी संवाद साधणार आहेत. युगेंद्र पवार राजकारणात येतील अशी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. त्यात युगेंद्र पवार आता सक्रीय राजकारणात उतरून युवकांची फळी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात ते शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचे दिसते. 

युगेंद्र पवार हे बुधवारी बारामतीतील पक्ष कार्यालयात शरद पवारांचे हात देशात बळकट करण्यासाठी आणि युवक, जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे पोस्टर्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात आणखी एक दादा सक्रीय होण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यात अजित पवार दरवेळी लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे शरद पवारांनीही बारामती गड आपल्याच ताब्यात ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. आतापर्यंत युगेंद्र पवार हे राजकारणापासून दूर होते. मात्र अजित पवारांनी शरद पवारांसोबत बंड केल्यानंतर युगेंद्र पवार चर्चेत आलेत. 

२०१९ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला होता. त्यावेळी अजित पवारांची नाराजी दूर करून त्यांना पुन्हा पक्षात आणण्यामध्ये श्रीनिवास पवार यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा शरद पवारांसोबत आले होते. श्रीनिवास पवार हे उद्योजक आहेत. त्यांना राजकारणात फारसा रस नाही. परंतु त्यांचे सुपुत्र युगेंद्र पवार आता सक्रीय राजकारणाकडे वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अजित पवार कुटुंबामध्येही राजकीय फुटीचे पडसाद दिसून येत आहेत. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस